शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
5
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
8
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
9
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
10
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
11
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
12
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
13
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
15
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
16
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
17
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
18
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
19
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
20
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 08:40 IST

...या प्रकरणी रशियन न्यायालयाने गुगलला एवढा दंड ठोठावला आहे की, आपणही थक्क व्हाल. खरे तर, एवढा पैसा या संपूर्ण पृथ्वीवरही उपलब्ध नाही.

रशिया आणि गुगल यांच्यात सुरू असलेला वाद आता संपूर्ण जगासाठी चर्चेचा विषय बनला आहे. क्रेमिकल समर्थक आणि सरकारी मीडिया आउटलेट्सची खाती पुनर्संचयित (Restore) न केल्याने रशियानेगुगलविरोधात अशी कारवाई केली आहे की, जी संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनली आहे. या प्रकरणी रशियन न्यायालयाने गुगलला एवढा दंड ठोठावला आहे की, आपणही थक्क व्हाल. खरे तर, एवढा पैसा या संपूर्ण पृथ्वीवरही उपलब्ध नाही.

खरे तर, गूगलला 2 अनडेसिलियन रूबल अथवा 2.5 डेसिलियन अमेरिकन डॉलर एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. आता, ही रक्कम नेमकी किती? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, एक डेसिलियन ही एक कार्डिनल संख्या आहे. अमेरिकेमध्ये 1 नंतर 33 शून्य देऊन ही संख्या दर्शवली जाते. तर ग्रेट ब्रिटनमध्ये 1 नंतर 60 शून्य देऊन ही संख्या दर्शवली जाते. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, जगाचा एकूण जीडीपी 100 ट्रिलियन डॉलर एवढा आहे. यावरून ही रक्कम किती मोठी आहे, याचा अंदाज येऊ शकतो. यामुळे एवढी मोठी रक्कम चुकवणे अथवा एवढ्या दंडाची भरपाई करणे गूगलच्या आवाक्या बाहेर आहे.

ऑगस्ट महिन्यात रशियन मीडिया आउडलेट्सवर खटले दाखल करण्यात आले होते - एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रशियन मीडिया आउटलेटविरोधात ऑगस्ट महिन्यात तीन प्रतिवादी खटले दाखल केल्यानंतर गुगलला दंड ठोठावण्यात आला आहे. तीन्ही खटल्यांत रशियन न्यायालयाचा निर्णय "अयोग्य" असल्याचे म्हणण्यात आले आहे. ज्यांत गूगल आणि गुगलशी संलग्न कंपन्यांना नियमांचे पालन न केल्याने आर्थिक दंड करण्यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे.गूगलने हजारवर यूट्यूब चॅनल ब्लॉक केले -महत्वाचे म्हणजे, रशियाने फेब्रुवारी 2020 मध्ये युक्रेनवर हल्ला केला. यानंतर गुगलने, आपण रशियन राज्य-अनुदानीत मीडियासाठी कमाईचा कार्यक्रम थांबवत आहोत, अशी घोषणा केली होती. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गुगलने युद्धसंदर्भातील आपल्या कंटेंट विषयक नियमांच्या पालनासंदर्भात 1000 हून अधिक YouTube चॅनल्स ब्लॉक केले आहेत. यानंतर गुगलने दैनंदिन दंड आकारणेही सुरू केले. हे प्रकरण मॉस्को न्यायालयात पोहोचले. यानंतर न्यायालयाकडून चॅनल्सवरील बंदी हटविण्याचे निर्देश देण्यात आले आणि गुगललाही दंड लावणे सुरू केले.

टॅग्स :russiaरशियाgoogleगुगलCourtन्यायालयMONEYपैसा