शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

फिनलँडच्या नाटो सदस्यत्वा संदर्भातील वक्तव्यानंतर रशिया भडकला; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 18:27 IST

जर या दोन्ही देशांच्या सत्ताधारी सोशल डेमोक्रॅटिक पक्षांनी पुढील काही दिवसांत नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तर नाटो थेट रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल.

फिनलँडने कसल्याही प्रकारचा वेळ न दवडता, नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज करायला हवा, असे फिनलँडच्या राष्ट्रपतींनी आणि पंतप्रधानांनी एका संयुक्त प्रेस रिलीजद्वारे म्हटले आहे. फिनलँडच्या या वक्तव्यानंतर, रशिया जबरदस्त भडकला आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, फिनलँड नाटोचा सदस्य होणे, हे रशियासाठी धोक्याचे असेल, असे क्रेमलिनने म्हटले आहे. तर नाटोमध्ये फिनलँडचा प्रवेश सुरळीत आणि लवकरात लवकर होईल, असे नाटो प्रमुख स्टोल्टेनबर्ग यांनी म्हटले आहे.

रशिया अणवस्त्र तैनात करणार?रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी नुकताच अमेरिका आणि युरोपीय युनियनला इशारा दिला होता, की जर फिनलँड अथवा स्वीडन यांनी नाटोत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तर रशिया बाल्टिक देश आणि स्कँडिनेव्हिया शेजारी अण्विक शस्त्रास्त्रे तैनात करेल. एवढेच नाही, फिनलँड अथवा स्वीडनने असे पाऊल उचलल्यास रशियाला या भागात अण्वस्त्रे तैनात करण्याचा अधिकार असेल. एवढेच नाही, तर रशिया आपले भूदल आणि वायूदल गंभीर्याने मजबूत करेल आणि फिनलँडच्या खाडीत नैदल तैनात करेल, असेही मेदवेदेव यांनी म्हटले होते.

फिनलँड आणि स्वीडन लवकरच घेणार निर्णय - नाटोच्या सदस्यावर फिनलँड आणि स्वीडन याच आठवड्यात मोठा निर्णय घेऊ शकतात. जर या दोन्ही देशांच्या सत्ताधारी सोशल डेमोक्रॅटिक पक्षांनी पुढील काही दिवसांत नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तर नाटो थेट रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिन