Chernobyl Reactor Video: एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला विराम मिळण्याच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच चर्नोबिल अणुभट्टीवर ड्रोन कोसळले. त्यामुळे स्फोट झालेल्या अणुभट्टीच्या सुरक्षा आवरणाला आग लागली होती. मात्र, वेळीच आग विझवण्यात आली. दरम्यान, रशियाने हा ड्रोन हल्ला केल्या असल्याचा दावा, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीने या घटनेचे फोटो शेअर केले आहेत. हल्ला आणि स्फोट होतानाचे व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
१३ ते १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १.५० वाजण्याच्या सुमारास आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीच्या पथकाला चेर्नोबिलच्या ठिकाणी स्फोट झाल्याचा आवाज आला. चर्नोबिलमधील ४ क्रमांकाच्या अणु भट्टी असलेल्या ठिकाणाला जे सुरक्षा आवरण करण्यात आले आहे, तिथून हा आवाज आला.
चर्नोबिल अणु भट्टीवर हल्ला, झेलेन्स्की काय म्हणाले?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. अणु ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करणे खूपच घातक आहे. रशियाचे ड्रोन चर्नोबिलच्या अणुभट्टीच्या सुरक्षा कवचावर पडले. या घटनेनंतरही उत्सर्जन स्तर सामान्य आहे. घटनेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग नियंत्रणात आणली, अशी माहिती झेलेन्स्कींनी दिली.
अणुभट्टीवर कोसळले ड्रोन, चिंता का वाढली?
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही वर्षांपासून युद्ध सुरू आहे. युद्धाचा भडका उडाल्यापासूनच अणुभट्ट्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. त्यातच आता ड्रोन कोसळून स्फोट झाला. तिथे आगही लागली होती, पण वेळीच ती विझवण्यात आली.
१९८६ मध्ये चर्नोबिलमध्ये काय घडलं होतं?
२६ एप्रिल १९८६ मध्ये चर्नोबिलमधील अणुऊर्जा केंद्रात स्फोट झाला होता. क्रमांक चारची अणुभट्टीत स्फोट झाल्यानंतर खूपच भयंकर परिणाम झाले. चर्नोबिल, युक्रेन आणि बेलारुसच्या सीमांना लागून आहे.
अणुऊर्जा केंद्रात एक चाचणी करण्यात आली. वीजनिर्मित आणि वाफेमुळे अनेक स्फोट झाले. त्यात अणुभट्टी फुटली. ही इतिहासातील सर्वात मोठी अणुऊर्जा दुर्घटना मानली जाते. या घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. स्फोटानंतर अनेक वर्ष या भट्टीतून उत्सर्जन होत राहिले. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले.