स्पुतनिक लाइट या नव्या लसीच्या वापरास रशियाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:32 AM2021-05-08T05:32:22+5:302021-05-08T05:33:04+5:30

जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसींपैकी बहुतांश लसी दोन डोसच्या आहे. स्पुतनिक लाइट ही लस स्पुतनिक  व्हीपेक्षा जास्त प्रभावी आहे.

Russia approves new Sputnik light vaccine | स्पुतनिक लाइट या नव्या लसीच्या वापरास रशियाची मंजुरी

स्पुतनिक लाइट या नव्या लसीच्या वापरास रशियाची मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्दे जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसींपैकी बहुतांश लसी दोन डोसच्या आहे. स्पुतनिक लाइट ही लस स्पुतनिक  व्हीपेक्षा जास्त प्रभावी आहे.

नवी दिल्ली : रशियाने स्पुतनिक लाइट ही नवी कोरोना लस बनविली असून तिच्या आपत्कालीन वापरास पुतीन सरकारने मान्यता दिली. स्पुतनिक लाइट लस एका डोसची असून ती ८० टक्के प्रभावी असल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाने याआधी बनविलेली स्पुतनिक व्ही लस भारतातील लसीकरण मोहिमेमध्ये आता वापरण्यात येणार आहे.

जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसींपैकी बहुतांश लसी दोन डोसच्या आहे. स्पुतनिक लाइट ही लस स्पुतनिक  व्हीपेक्षा जास्त प्रभावी आहे. स्पुतनिक व्हीचे दोन डोस घेतल्यानंतर ती लस कोरोनावर ९१.६ टक्के प्रभावी ठरते. मात्र स्पुतनिक लाइटचा एकच डोस घेतल्यानंतर ही लस ७९.४ टक्के परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. 

२८ दिवसांनी अँटिबॉडी विकसित
स्पुतनिक लाइट लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी अँटिबॉडी विकसित होतात.  ५ डिसेंबर २०२० ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीत रशियाने व्यापक लसीकरण मोहीम राबविली. त्यामध्ये स्पुतनिक लाइट लस रशियातील नागरिकांना देण्यात आली.  

Web Title: Russia approves new Sputnik light vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.