अश्या दोरीउड्या तुम्ही मारु शकाल का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 11:34 AM2017-11-28T11:34:57+5:302017-11-28T11:46:10+5:30

दोरीउड्या हा आपण प्रत्येकाने लहानपणी खेळलेला खेळ आहे. पण तो तेवढ्यापुरता मर्यादीत नाहीये.

rope skipping competition video will make you awe | अश्या दोरीउड्या तुम्ही मारु शकाल का ?

अश्या दोरीउड्या तुम्ही मारु शकाल का ?

ठळक मुद्देहा व्हिडिओ पाहताना तुम्हालाही तुमच्या लहानपणीची नक्की आठवण येईल. त्याकाळी दोरीच्या उड्यांचे अनेक प्रकार आपण खेळायचो. त्यामध्ये हा वरचा प्रकारही होता. कोण किती जलदगतीने खेळतंय, कोणाला किती प्रकार येतात याकडे सगळ्याचंच लक्ष असायचं.

चीन : लहानपणी तुम्ही दोरी-उडीचा खेळ खेळला असालच. त्यावेळेस खेळ म्हणून दोरीच्या उड्या मारल्या जायच्या. आताही दोरीच्या उड्यांचा वापर व्यायामासाठी केला जातो. सदृढ शरीरासाठी दोरीच्या उड्या मारणं केव्हाही उत्तम. मात्र खेळ म्हणून दोरीच्या उड्यांची क्रेझ भारतात कमी असली तरीही परदेशात या खेळाचे आंतरराष्ट्रीय दर्जावर स्पर्धाचं आयोजन करण्यात येतं. असाच एका स्पर्धेतील एक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

आणखी वाचा - लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा।।

लहानपणी तुम्ही दोरीच्या उड्यांचे अनेक प्रकार पाहिले असतील, खेळले असतील. त्यापैकीच एक होता रशीचे उड्डीचे दोन्ही टोक दोन्ही बाजूला दोन खेळाडूंनी धरायचे. तिसऱ्या खेळाडूने मधोमध उभं राहून दोरीला अजिबात स्पर्श न होता त्यावरून उड्या मारायच्या. आवठतोय का हा खेळ? आठवत असेलच. पण आता दोरीच्या उड्यांचा हाच डाव आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ बनला आहे. क्षणाचाही विलंब न होता पटापट त्या दोरींवरून उडी मारणं काही सोपं नाही. अशीच स्पर्धा जपान, ऑस्ट्रेलिया आणि चीन या तीन संघामध्ये लागली होती. ही स्पर्धा पाहतानाच इतकी रंजक वाटते की प्रत्यक्षात खेळताना किती आनंद मिळत असेल. 

आणखी वाचा - तुमचं मूल स्पर्धेसाठी, करिअरसाठी खेळ खेळतं कि स्वत:च्या विकासासाठी?

पहिल्या फेरीत जपान आणि चीनचे संघ आमनेसामने होते, तर पुढच्या फेरीत ऑस्ट्रेलिया आणि चीन या संघात चुरशीची स्पर्धा रंगली. शेवटच्या फेरीत स्पर्धा भारीच रंगली होती. दोन्ही बाजूने दोन खेळाडू दोरी वेगाने हलवणार आणि तिसरा खेळाडू दोरीला स्पर्श न होता त्या दोरींवरून पटापट उडी मारायची. या चुरशीच्या लढतीत चीनच्या संघाने बाजी मारली. एका मिनिटात तब्बल २५८ उड्या मारून चीनचा संघ विजयी ठरला. तर ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धकाने एका मिनिटात २२६ उड्या मारल्या आहेत. ही स्पर्धा परदेशातील अनेक क्रिडा चॅनेलवर दाखवण्यात आली. 

आणखी वाचा - मुलांच्या हातात खेळणी देतांना तुम्ही हा विचार करतात का?

हा व्हिडिओ पाहताना तुम्हालाही तुमच्या लहानपणीची नक्की आठवण येईल. त्याकाळी दोरीच्या उड्यांचे अनेक प्रकार आपण खेळायचो. त्यामध्ये हा वरचा प्रकारही होता. कोण किती जलदगतीने खेळतंय, कोणाला किती प्रकार येतात याकडे सगळ्याचंच लक्ष असायचं. पण हा खेळही आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळला जातो याची आपल्याला कल्पनाही नसेल. पण आता दोरींच्या उड्या आपण केवळ व्यायामापुरतचा ठेवलाय.

Web Title: rope skipping competition video will make you awe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.