America Israel Iran War: अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या तीन फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यात इराणमध्ये २०० पेक्षा अधिक जण ठार झाले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह आठ देशांवर प्रतिहल्ले केले. अद्यापही अनेक ठिकाणी हल्ले सुरूच आहेत. मध्य पूर्वेतील देशांमधील तणाव वाढताना पाहायला मिळत आहे. इराण अमेरिकेचे तळ असणाऱ्या अन्य देशातील ठिकाणी मोठे हल्ले चढवत आहे, तर इस्रायल तेहरानमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रे डागत आहे. या सर्व घडामोडींवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे. यातच या अनेक देशांमध्ये हजारो भारतीय अडकले आहेत.
कुवैत येथे काम करण्यासाठी गेलेल्या बिहारी युवक रोहित कुमार याने थेट पंतप्रधान मोदी यांना हे युद्ध थांबवण्याचे साकडे घातले आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. स्थानिक भाषेत संवाद साधला आहे. रोहित कुमार म्हणतात की, हात जोडून विनंती आहे की, ही लढाई थांबावी. इथे खूपच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हृदयाची धडधड मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. हे असे कृत्य करणे यांच्या मनात कुठून आले काय माहिती. आता वाटत आहे की, मोदींनाच बोलवावे लागेल. मोदीजींनी मनात आणले, तरच आता काहीतरी होऊ शकेल. मोदीजी, माझे म्हणणे ऐका. लगेच इथे कुवैतला या आणि इराण तसेच अमेरिकेला समजवा, असे आवाहन रोहित यांनी केले आहे.
ही लढाई, संघर्ष थांबला, तरच दोन पैसे कमावता येतील
ही लढाई, संघर्ष थांबला, तरच दोन पैसे कमावता येतील. मोदीजी, तुम्हीच गुरू आहात. जे काही करायचे आहे, ते तुम्हालाच करायचे आहे. हा वाद फक्त तुम्हीच मिटवू शकता. मोदीजी, आमचे नशीबच खराब आहे. लवकरच हा वाद मिटायला हवा. मोदीजी, तुम्ही लवकरात लवकर हे सगळे थांबवा. नमस्कार, प्रणाम, धन्यवाद..., असे रोहित यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इस्रायल आणि इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे. याबाबतची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली. मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला. तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिकचं आवाहन केलं. तसेच इराणचे परराष्ट्रमंत्री मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली.
Web Summary : Amidst rising Iran-US tensions, a Bihari worker in Kuwait appeals to PM Modi to intervene and mediate peace. He fears for his safety and livelihood as conflict escalates. India is closely monitoring the situation and engaging with both nations.
Web Summary : ईरान-अमेरिका के बढ़ते तनाव के बीच, कुवैत में एक बिहारी कार्यकर्ता पीएम मोदी से हस्तक्षेप करने और शांति स्थापित करने की अपील करता है। संघर्ष बढ़ने से उसे अपनी सुरक्षा और आजीविका का डर है। भारत स्थिति पर बारीकी से नजर रख रहा है और दोनों देशों के साथ बातचीत कर रहा है।