शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
4
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
6
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
7
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
8
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
10
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
11
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
12
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
15
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले

कंदाहार विमानतळावर तालिबानने केले रॉकेट हल्ले, हवाई वाहतूक बंद; अफगाणी लष्कराविरोधात संघर्ष टिपेला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 8:30 AM

Rocket attacks by Taliban on Kandahar airport: अफगाणिस्तान सरकारचे लष्कर व तालिबान यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला असून कंदाहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ले केले.

कंदाहार : अफगाणिस्तान सरकारचे लष्कर व तालिबान यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला असून कंदाहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ले केले. त्यामुळे तेथील विमान वाहतूक सध्या काही काळापुरती बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात तालिबानचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, अफगाणिस्तानी लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी आम्हीही तसेच हल्ले चढविले. कंदाहार विमानतळावर शनिवारी तीन रॉकेटचा मारा करण्यात आला.कंदाहार विमानतळाचे प्रमुख मसूद पश्तुन म्हणाले की, तीनपैकी दोन रॉकेटमुळे धावपट्टीचे नुकसान झाले असून त्यावरून सध्या विमाने ये-जा करणे शक्य नाही. धावपट्टी दुरुस्त झाल्यानंतर तसेच परिस्थिती निवळल्यानंतर विमान वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. कंदाहार विमानतळावर रॉकेट हल्ला झाल्याच्या घटनेला अफगाणिस्तानच्या हवाई वाहतूक खात्याच्या प्रवक्त्यानेही दुजोरा दिला. कंदाहारच्या परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून तालिबानने जोरदार हल्ले सुरू केले आहेत. हे शहर तालिबान लवकरच ताब्यात घेतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास तालिबानींना आपल्या साथीदारांना रसद पुरविणे अधिक सोयीचे होणार आहे. कंदाहार हे अफगाणिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते तालिबानींच्या हाती पडले तर अफगाणी लष्करासाठी ती नामुष्की असेल. त्या देशातील हेरात व लष्कर गाह ही दोन शहरे तालिबान कधीही ताब्यात घेतील अशी स्थिती आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू आहे. ग्रामीण भागात तैनात असलेले अमेरिकी सैन्य माघारी गेल्यानंतर त्या भागाची सुरक्षा अफगाणी लष्कराकडे सोपविण्यात आली होती. तिथे आता तालिबानने कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. (वृत्तसंस्था) 

निम्मा भाग काबीज केल्याचा दावा अफगाणिस्तानचा निम्मा भाग आम्ही काबीज केला आहे, असा तालिबानने केलेला दावा त्या देशाच्या सरकारने फेटाळून लावला आहे. मात्र ज्या आक्रमकपणे तालिबान संघर्ष करत आहेत, त्यापुढे अफगाणी लष्कर किती काळ टिकाव धरेल याबद्दल पाश्चात्त्य देशांच्या मनात शंका आहे. इराण व पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेला अफगाणिस्तानचा मोठा प्रदेश तालिबानच्या ताब्यात गेला आहे.  तालिबानींना आता राजधानी काबूलवर कब्जा करण्याचे वेध लागले आहेत.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तान