अंटार्टिकावरील गुरुत्वाकर्षण क्षमतेला धोका

By admin | Published: May 26, 2015 11:50 PM2015-05-26T23:50:48+5:302015-05-26T23:50:48+5:30

अंटार्टिकावरील बर्फाचा थर झपाट्याने कमी होत असून, हा थर कमी होण्याचे परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षमतेवरही होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

The risk of gravitational abilities in the Antarctica | अंटार्टिकावरील गुरुत्वाकर्षण क्षमतेला धोका

अंटार्टिकावरील गुरुत्वाकर्षण क्षमतेला धोका

Next

न्यूयॉर्क : अंटार्टिकावरील बर्फाचा थर झपाट्याने कमी होत असून, हा थर कमी होण्याचे परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षमतेवरही होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. अंटार्टिकाच्या दक्षिण भागावर पृथ्वीच्या तापमानवाढीचा परिणाम फारसा होत नाही असे मानले जात असे. या समजाला पहिला धक्का बसला २००९ साली. त्यावेळी अनेक हिमनद्या (७५० कि.मी. लांबी) अचानक बर्फाचे थर समुद्रात लोटू लागल्या. सायन्स या विज्ञानविषयक नियतकालिकात ही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.
समुद्रात बर्फाचे थर लोटले गेल्यामुळे समुद्राचे पाणी ३०० क्युबिक कि.मी.ने वाढले. असे संशोधक डॉ. बर्ट वौटर्स यांनी म्हटले आहे. वौटर्स हे ब्रिस्टॉल येथील मेरी क्युरी विद्यापीठाचे फेलो आहेत. युरोपियन अवकाश संस्थेने बर्फाचे थर मोजण्यासाठी अवकाशात प्रक्षेपित केलेल्या क्रायोसॅट-२ या अवकाश यानाच्या साहाय्याने हे बदल मोजण्यात आले आहेत. गेली ५ वर्षे मिळालेल्या माहितीवरून काही हिमनद्यांवरील बर्फाचा थर सातत्याने कमी होत आहे. दरवर्षी तो ४ मीटरने कमी होतो. हा बर्फ नाहीसा होणे नाट्यमय असून त्याचा परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर होणार हे स्पष्ट आहे. या गतीने बर्फ नाहीसा होत असेल, तर येत्या काही वर्षात हा थर पूर्णपणे नाहीसा होईल असे दिसत आहे. ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड क्लायमेट एक्सपिरीमेंट या उपग्रहाने गुरुत्वाकर्षणात होणाऱ्या बदलांची माहिती दिली आहे. (वृत्तसंस्था)

४दक्षिण अंटार्टिकामधील अनेक हिमनद्या आपले बर्फाचे थर समुद्रात लोटत असून, हे थर समुद्रात साचत जातात. परिणामी नवे थर सामावून घेतले जात नाहीत. हवामान बदल व ओझोनचा थर पातळ झाल्याने अंटार्टिकावर वाहणारे वेस्टर्ली विंड्स नावाचे वारे अधिक प्रबळ झाले आहेत.
४या वाऱ्यामुळे समुद्राचे उष्ण पाणी पृथ्वीच्या ध्रुवाकडे फेकले जाते. या पाण्यामुळे बर्फाचे थर वितळतात व नव्या थरांना जागा होते. या घटनाक्रमामुळे अंटार्टिकावरील एक पंचमांश जाडीचा बर्फथर नष्ट झाला आहे, त्यामुळे हिमनद्यांची प्रतिकार क्षमताही कमी झाली आहे.

Web Title: The risk of gravitational abilities in the Antarctica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.