नवी दिल्ली : भारताने गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद तत्काळ खाली करण्यास सांगितल्यानंतर हवामान विभागानेही तेथील हवामानाचा अंदाज देण्यास सुरुवात केली होती. यावरून खवळलेल्या पाकिस्तानने जम्मू काश्मीर आणि लडाखवरून भारतावर कडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये पाकिस्तान तोंडावर आपटला आहे. ट्विटरवर पाकिस्तानची 'अक्कल' काढण्यात येत होती.
पाकिस्तानने भारताला धक्का देण्यासाठी पाकिस्तानी रेडिओवर रविवारी जम्मू-काश्मीरचे हवामानाचे अंदाज दिले. यामध्ये श्रीनगर, पुलवामा, जम्मू आणि लडाखमधील कमाल आणि किमान तापमान देण्यात आले. पाकिस्तानी रेडिओवर आधीपासून काश्मीरवर विशेष पॅकेज देण्यात येते. सरकारी टीव्ही चॅनेलनेही काश्मीर घाटीवरून विशेष बुलेटिन काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पाकिस्तानी रेडिओने आज कमाल केली.
मात्र, लडाखच्या हवामानावर माहिती देताना मोठी गडबड केली. यामुळे सोशल मिडीयावर पाकिस्तानला खूपच अपमान झेलावा लागला आहे. पाकिस्तानी रेडिओने ट्विटमध्ये लडाखचे कमाल तापमान -४ डिग्री आणि किमान तापमान -१ डिग्री असल्याचे म्हटले. यावरून पाकिस्तानला नेटकऱ्यांनी अक्षरश: झोडून काढले.
महत्वाच्या बातम्या...
पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली
पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा
CoronaVirus मुंबईकरांसाठी चिंताजनक! नव्या रुग्ण संख्येत मोठी वाढ; बळींचा आकडा ५०० पार