बँकॉक स्फोटातून रितेश-जेनेलिया थोडक्यात बचावले

By Admin | Updated: August 18, 2015 10:11 IST2015-08-18T10:00:44+5:302015-08-18T10:11:13+5:30

बँकाकमध्ये झालेल्या शक्तीशाली बाँबस्फोटातून अभिनेते रितेश व जेनेलिया देशमुख थोडक्यात बचावले.

Ricci-Genelia briefly escaped from the Bangkok blast | बँकॉक स्फोटातून रितेश-जेनेलिया थोडक्यात बचावले

बँकॉक स्फोटातून रितेश-जेनेलिया थोडक्यात बचावले

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - बँकाकमध्ये झालेल्या शक्तीशाली बाँबस्फोटातून अभिनेते रितेश व जेनेलिया देशमुख थोडक्यात बचावले आहेत.
ज्या मंदिराजवळ हा स्फोट झाला त्यावेळी ते दोघे तेथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मॉलमध्ये होते. जेनेलियाने या स्फोटाची माहिती देतानाच आपण सुरक्षित असल्याचेही म्हटले. 
' आम्ही सध्या ज्या मॉलमध्ये आहोत त्यासमोर बाँबस्फोट झाला आहे. मदत कार्यासाठी आलेल्या यंत्रणांच्या सायरनचे आवाज इथे स्पष्ट ऐकू येत आहेत. इथे (मॉलमध्ये) आम्ही सुरक्षित असलो तरी या स्फोटात ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्याबद्दल खूप दु:ख होत आहे' असे ट्विट जेनेलियाने केले आहे. 
काल संध्याकाळी हिंदू मंदिर एरावनच्या बाहेर झालेल्या या स्फोटात २७ ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. ब्रह्माचे हे मंदिर बाजारपेठेतून जाणा-या मुख्य रस्त्यावर असून त्याच्या भोवती तीन मुख्य शॉपिंग मॉल्स आहेत. त्यापैकी एका मॉलमध्येच रितेश -जेनेलिया शॉपिंग करत होते.

Web Title: Ricci-Genelia briefly escaped from the Bangkok blast