शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Reward on Vladimir Putin: पुतीन पाहिजेत, जिवंत किंवा मृत! १ दशलक्ष डॉलर देईन; रशियन अब्जाधीश वैतागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 14:19 IST

bounty on Vladimir Putin: अमेरिकेच्या खासदारानेही पुतीन यांची हत्या करण्यात यावी, म्हणजे युद्ध थांबेल असे म्हटले आहे. पुतीन यांच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियन जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मॉस्को: युक्रेनवर हल्ला केल्याने रशियाच्या राज्यकर्त्यांपेक्षा तेथील जनतेला भोगावे लागणार आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी रशियाला सेवा देण्यास नकार दिला आहे. एवढे की रशियन लोक त्यांची एटीएम वापरू शकत नाहीत की पैसे वाढू शकत नाहीत. अनेकांच्या मोबाईलमधील सेवा बंद झालेल्या आहेत. पुढेही हे भोग भोगायचे आहेत. लोकांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या या युद्धाच्या निर्णयाविरोधात आंदोलने सुरु केली असून एका अब्जाधीशाने तर पुतीन यांना जो कोणी जिवंत किंवा मृत आणून देईल त्याला १ दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. 

भारतीय रुपयांत ही रक्कम जवळपास साडे सात कोटी रुपये होते. रशियाचे उद्योगपती एलेक्स कोन्याखिन यांच्या डोक्यावर हा इनाम घोषित केला आहे. 'Wanted: Dead or Alive. For Mass Murder' अशा प्रकारचे पोस्टर त्यांनी लिंक्डइनवर शेअर केले आहे. पुतीन यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार युद्ध गुन्हेगारी केली आहे, त्या बदल्यात त्यांना जो कोणी जिवंत किंवा मृत पकडून आणेल त्याला १ दशलक्ष डॉलरचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. 

कोन्याखिन यांच्या या पोस्टला फेसबुकने नियमांचे उल्लंघन मानत हटविले आहे. यावर उद्योगपतीने स्पष्ट करताना म्हटले की, मी लोकांना पुतीन यांना मारण्यास सांगितले नाही. माझा उद्देश तो नव्हता. त्यांना कायद्याच्या चौकटीत आणले जावे, हा माझा उद्देश होता. कोन्याखिन यांची ही पोस्ट युक्रेन हल्ल्याच्या आठ दिवसांनी आली आहे. युक्रेनमध्ये रशियाने खूप नुकसान केले आहे. विद्ध्वंस माजविला आहे. तर युक्रेननेही रशियाला पुरते बेजार करत ९००० सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. तसेच शेकडो रणागाडे, युद्धक वाहने, लढाऊ विमाने नष्ट केल्याचे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे अमेरिकेच्या खासदारानेही पुतीन यांची हत्या करण्यात यावी, म्हणजे युद्ध थांबेल असे म्हटले आहे. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया