अमेरिकेवर सूड घेतला जाईल : हमजा बिन लादेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 04:16 IST2016-07-11T04:16:25+5:302016-07-11T04:16:25+5:30

कुख्यात जागतिक दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या हत्येचा अमेरिकेवर सूड उगवला जाईल, अशी धमकी लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन (२०) याने दिली आहे.

Revenge will take place in America: Hamza bin Laden | अमेरिकेवर सूड घेतला जाईल : हमजा बिन लादेन

अमेरिकेवर सूड घेतला जाईल : हमजा बिन लादेन


दुबई : कुख्यात जागतिक दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या हत्येचा अमेरिकेवर सूड उगवला जाईल, अशी धमकी लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन (२०) याने दिली आहे. या धमकीचा आॅडिओ मेसेज आॅनलाइन पोस्ट करण्यात आला आहे.
हमजा बिन लादेन याने अमेरिका आणि अमेरिकेच्या आघाडीतील २१ देशांविरुद्ध जागतिक दहशतवादी गट संघर्ष सतत सुरूच ठेवील, असे २१ मिनिटांच्या भाषणात सांगितले. या आॅडिओचे नाव ‘आम्ही सगळे ओसामा आहोत’ (वुई आर आॅल ओसामा) असे एसआयटीई गुप्तरचर गटाने सांगितले.
‘‘तुम्ही मुस्लीम देशांतील लोकांवर केलेल्या अत्याचारांचा निषेध म्हणून आम्ही तुमच्यावर सतत हल्ले सुरूच ठेवू, तुम्हाला लक्ष्य करू, असेही आॅडिओमध्ये म्हटले.(वृत्तसंस्था)

Web Title: Revenge will take place in America: Hamza bin Laden