सहाशे भारतीय उद्यार्पयत परतणार
By Admin | Updated: July 6, 2014 01:56 IST2014-07-06T01:56:13+5:302014-07-06T01:56:13+5:30
सुन्नी बंडखोरांच्या हिंसाचारामुळे प्रभावित इराकमधील सुमारे 6क्क् भारतीय नागरिक येत्या दोन दिवसांत मायदेशी परतणार आहेत़

सहाशे भारतीय उद्यार्पयत परतणार
नवी दिल्ली : सुन्नी बंडखोरांच्या हिंसाचारामुळे प्रभावित इराकमधील सुमारे 6क्क् भारतीय नागरिक येत्या दोन दिवसांत मायदेशी परतणार आहेत़ इराकमधून परतणा:या भारतीय नागरिकांपैकी 2क्क् शनिवारी रात्रीच नजफ येथून इराकी एअरवेजच्या विशेष चार्टर्ड विमानाने दिल्लीत पोहोचणार आहेत़
परराष्ट्र मंत्रलयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली़ इराकमधून भारतीय नागरिकांच्या परतीच्या प्रक्रियेला गती आली आह़े
2क्क् भारतीय आज रात्री दिल्लीत पोहोचणार आहेत़ तर सोमवार्पयत अन्य 4क्क् भारतीय नागरिक मायदेशी परतणार आहेत़ सुमारे 12क्क् नागरिक सरकारच्या खर्चावर भारतात परतण्याची शक्यताही प्रवक्त्याने वर्तवली़
(लोकमत न्यूज नेटवर्क)