दहशतवादाच्या नायनाटाचा संकल्प

By Admin | Updated: March 24, 2016 00:42 IST2016-03-24T00:42:21+5:302016-03-24T00:42:21+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांच्या देशाला असलेल्या दहशतवाद आणि कट्टरवादाच्या अभूतपूर्व धोक्याकडे लक्ष वेधताना या विनाशकारी प्रवृत्तीला पराभूत करण्यासोबतच

The resolution of the annihilation of terrorism | दहशतवादाच्या नायनाटाचा संकल्प

दहशतवादाच्या नायनाटाचा संकल्प

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांच्या देशाला असलेल्या दहशतवाद आणि कट्टरवादाच्या अभूतपूर्व धोक्याकडे लक्ष वेधताना या विनाशकारी प्रवृत्तीला पराभूत करण्यासोबतच आमच्या भूमीवरून तिचा संपूर्ण नायनाट केला जाईल, अशी ग्वाही बुधवारी दिली.
येथील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात ७६ वा पाकिस्तान दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगाचे औचित्य साधून शरीफ यांनी लिखित संदेश पाठविला आहे. या संदेशात त्यांनी आपल्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्यायाचे वचन दिले. शरीफ म्हणतात, आज आमच्यासमक्ष कट्टरवाद आणि दहशतवादाच्या रूपात मोठे आव्हान उभे ठाकले आहे; परंतु या दुष्ट प्रवृत्तीवर विजय संपादन करण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे.
आपल्या सरकारने पाकिस्तानात अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि महिलांच्या सबलीकरणासाठी ऐतिहासिक पावले उचलली आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The resolution of the annihilation of terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.