सागरी जीवांच्या २ लाख नव्या प्रजातींचा शोध
By Admin | Updated: May 23, 2015 23:54 IST2015-05-23T23:54:10+5:302015-05-23T23:54:10+5:30
महासागरात सध्या असलेला सगळ्यात छोटा जीव प्लँकटनच्या संदर्भात ‘सायन्स’ नावाच्या नियतकालिकात माहिती देण्यात आली आहे.

सागरी जीवांच्या २ लाख नव्या प्रजातींचा शोध
महासागरात सध्या असलेला सगळ्यात छोटा जीव प्लँकटनच्या संदर्भात ‘सायन्स’ नावाच्या नियतकालिकात माहिती देण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय तुकडी प्लँकटनवर संशोधन करीत आहे. या तुकडीने आतापर्यंत बॅक्टेरियाच्या ३५ हजार प्रजाती, व्हायरसच्या पाच हजार आणि कोषकीय रोपांच्या किमान १.५ लाख प्रजातींचा शोध लावला आहे.
नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचे (एनसीएसएस) डॉ. ख्रिस बोलर यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, ‘प्लँकटॉनिक जीवांबद्दल आज तरी आमच्याकडे सगळ्यात जास्त माहिती आहे. यात व्हायरस आणि प्रोटोजोआचा समावेश आहे.’
प्लँकटॉनिक जीव जरी खूप लहान असले तरी सागरी जीवनाचा जवळपास ९० टक्के भाग त्यांच्याचपासून बनलेला असतो. यात व्हायरस, बॅक्टेरिया, कोषिकीय रोपे आणि प्रोटाजोआचा समावेश आहे. प्लँकटन अन्नसाखळीचा पाया समजले जातात. तथापि, त्यांच्याबद्दल अजूनही खूप कमी माहिती उपलब्ध आहे.