‘हिलरींची सुरक्षा काढा’

By Admin | Updated: September 18, 2016 04:12 IST2016-09-18T04:12:40+5:302016-09-18T04:12:40+5:30

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वाद पेटला आहे.

'Remove Hillary's safety' | ‘हिलरींची सुरक्षा काढा’

‘हिलरींची सुरक्षा काढा’


मियामी : अमेरिकेतील बंदुकांच्या मुक्त वापरावर बंधने आणावीत की नको, यावरून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वाद पेटला आहे.
हिलरी क्लिंटन यांनी बंदुका बाळगण्याचे नियम कठोर करण्यास अनुकूलता दर्शविली होती. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली ‘हिलरी यांच्या सुरक्षारक्षकांकडील बंदुका काढून घ्या, मग बघा काय होते’ असे थेट आव्हानच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Remove Hillary's safety'