शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:23 IST

चीनच्या या निर्णयानं पाकिस्तानच्या भारताशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नांना फटका बसला आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट झाल्याचं दिसून आले होते. त्यानंतर पाकिस्ताननेचीनकडे सतत एक मागणी लावून धरली होती. ज्यात चीनकडून हायपरसोनिक मिसाइल आणि त्याला बनवण्याचं तंत्रज्ञान देण्याची मागणी केली होती. परंतु आता चीनने स्पष्ट शब्दात पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे. या मिसाईल आता निर्यात करण्यासाठी उपलब्ध नाहीत, याचा कुठलाही व्हर्जन अद्याप बनवला नाही जे दुसऱ्या देशांना देता येऊ शकते असं चीनने सांगितले आहे.

पाकिस्तानला का हवी मिसाईल?

भारत ज्यारितीने वेगाने आधुनिक तंत्रज्ञान आणि मिसाईल टेक्निक वाढवत आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानला चीनकडून मदत हवी होती. भारताने याआधीच HSTDV सारख्या मिसाईलची चाचणी केली आहे. ही प्रचंड वेगवान आणि आधुनिक मिसाईल आहे. त्यामुळे पाकिस्तान चीनच्या मागे हायपरसोनिक मिसाईल देण्याची मागणी करत होता परंतु चीनने त्यास नकार दिला आहे. चीनच्या नकारामागे २ प्रमुख कारणे सांगितली जातात. त्यात पहिले म्हणजे पाकिस्तानकडे उपलब्ध असणाऱ्या चिनी शस्त्रांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमकुवत होत आहे. दुसरे कारण म्हणजे पाकिस्तानला जर हे तंत्रज्ञान दिले तर ते पाश्चात्य देशांनाही देण्याची भीती चीनला आहे. पाकिस्तानला याआधीच चीनकडून लढाऊ विमाने आणि मिसाईल सिस्टम मिळाले आहे परंतु हायपरसोनिक मिसाइलसारखं संवेदनशील तंत्रज्ञान पाकला देणे चीनला विश्वासाचे वाटत नाही. 

हायपरसोनिक मिसाईल देशाबाहेर पाठवायची नाही

डिफेन्स वेबसाईटनुसार, चीन त्यांची इतर शस्त्रे जसं J10CE लढाऊ विमाने आणि HQ9 एअर डिफेन्स सिस्टमचे खास एक्सपोर्ट व्हर्जन बनवते परंतु हायपरसोनिक मिसाईल इतकी आधुनिक आणि संवेदनशील आहे जी त्याला बाहेर देशात पाठवायची नाही. जगातील संतुलन बिघडू शकणारी अतिशय आधुनिक आणि शक्तिशाली शस्त्रे इतर देशांना देऊ नयेत, असे चीनचे धोरण आहे. मात्र पाकिस्तानला चीनच्या मदतीने या मिसाईल खरेदी करायच्या आहेत आणि स्वत: बनवायच्या आहेत. परंतु चीनने नकार दिल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. 

चीनच्या या निर्णयानं पाकिस्तानच्या भारताशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नांना फटका बसला आहे. चीन हायपरसोनिक मिसाईल तंत्रज्ञान त्यांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा भाग मानते. विशेषत: अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांविरोधात हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे इतकी संवेदनशील माहिती पाकिस्तानसारख्या जवळच्या देशालाही त्यांना द्यायचे नाही जेणेकरून जागतिक स्तरावर दबाव आणि राजनैतिक तणाव वाढवता येईल. आणखी एक कारण म्हणजे, चीन सध्या या मिसाईलला अजून उत्तम आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर कुठल्याही अन्य देशाला ते ट्रान्सफर करण्यास तयार नाहीत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत