शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
2
Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
3
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
4
खुला प्रवर्ग कुणासाठी राखीव नाही, सरकारी नोकरीत निवड मेरिटवर व्हावी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
5
उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे
6
"तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडी देतील"; तानाजी सावंतांचा भाजपासह पाटलांवर टीकास्त्र
7
निवडणूक आयोगाचा अजब कारभार, उमेदवाराचा AB फॉर्म गहाळ; अधिकाऱ्याला बसला फटका
8
'मी कधीच पक्षाच्या विचारधारेपासून दूर गेलो नाही', PM मोदी अन् अडवाणींच्या कौतुकावर थरुर म्हणाले...
9
रेल्वे रुळांना वर्षानुवर्षे गंज का लागत नाही? तुम्हाला माहितेय का? त्यामागं दडलंय खास कारण!
10
सूचकाच्या अर्जावरून अपक्षाचा अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ठाण्यात काय घडलं?
11
"मी धनूभाऊंना परळी देऊन टाकली!" पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत, भावंडांच्या नात्यात नवा अध्याय!
12
बँकेच्या लॉकरमधून २६ तोळे सोनं काढलं, चुकून दुसऱ्याच्या डिक्कीत ठेवलं, पुढं असं घडलं की...
13
आई, भाऊ आणि बहिणीची हत्या करून पोलीस ठाण्यात गेला, म्हणाला...; तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली
14
"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"
15
तुम्ही देवालाही सोडलं नाही, सबरीमाला सोने चोरी प्रकरणी याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले
16
सारा तेंडुलकरने पापाराझीला पाहून पटकन तोंड का लपवलं? VIRAL VIDEO मुळे इंटरनेटवर रंगली चर्चा
17
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
18
‘मी माझ्या आई, बहीण, भावाला ठार मारलंय’, तिघांचा खून करून पोलीस ठाण्यात आला तरुण
19
एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण?
20
भाग्यवान! पिठाची गिरणी चालवणाऱ्याचं एका क्षणात फळफळलं नशीब, 'असा' झाला करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी हस्तक्षेप केल्याने सुटलेले...! कतारमध्ये भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला पुन्हा बेड्या; पुर्णेंदू तिवारींच्या भारत वापसीवर अनिश्चिततेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:43 IST

Purnendu Tiwari re-arrested Qatar: कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपातून सुटका झालेल्या ८ भारतीय नौदल अधिकाऱ्यांपैकी एक, पुर्णेंदू तिवारी यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.

कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपातून झालेली फाशीची शिक्षा रद्द झाल्यानंतर मायदेशी परतण्याची वाट पाहणाऱ्या पुर्णेंदू तिवारी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भारतीय नौदलाच्या या माजी कमांडरला कतारमध्ये पुन्हा अटक करण्यात आली असून, त्यांना एका नव्या कायदेशीर प्रकरणात ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या भारत वापसीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये कतारने ८ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्थीनंतर सात अधिकारी फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतात सुखरूप परतले. मात्र, 'दहरा ग्लोबल' कंपनीचे एमडी असलेले पुर्णेंदू तिवारी यांना कतारने प्रवासावर निर्बंध लावून तेथेच रोखून धरले होते. ताज्या माहितीनुसार, तिवारी यांना आर्थिक गैरव्यवहार आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली पुन्हा अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

नवा खटला आणि ६ वर्षांची शिक्षाकतारमधील एका स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार पुर्णेंदू तिवारी यांना गुन्हेगारी कटासाठी ३ वर्षे आणि मनी लाँडरिंगसाठी ३ वर्षे अशी एकूण ६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा दंडही आकारण्यात आला असून, शिक्षा पूर्ण झाल्यावर त्यांना लगेचच कतारमधून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

लष्करी कंत्राटांशी संबंधित निविदांची माहिती मिळवण्यासाठी कतारच्या एका संरक्षण अधिकाऱ्याशी संपर्क साधल्याचा आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

कुटुंबियांची पंतप्रधान मोदींकडे धावग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या पुर्णेंदू तिवारींच्या भगिनी डॉ. मीतू भार्गव यांनी एक व्हिडिओ जारी करून केंद्र सरकारकडे मदतीची याचना केली आहे. "माझे भाऊ ६५ वर्षांचे असून त्यांना गंभीर आजार आहेत. त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवणे अन्यायकारक आहे," असे त्यांनी म्हटले आहे. भारत सरकारने या प्रकरणात तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाची भूमिकाभारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) या अटकेची दखल घेतली असून, हा विषय 'न्यायप्रविष्ट' असल्याचे म्हटले आहे. कतारमधील भारतीय दूतावास तिवारींना कायदेशीर मदत पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, नव्या खटल्यामुळे ही कायदेशीर लढाई आता अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Indian Navy officer rearrested in Qatar despite Modi's intervention.

Web Summary : Purnendu Tiwari, awaiting return after his death sentence was overturned, has been rearrested in Qatar. He faces a new 6-year sentence for financial crimes, jeopardizing his return to India. His family seeks Modi's intervention.
टॅग्स :Qatarकतार