शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पाकिस्तानला मोठा धक्का, ट्रम्प यांचा तालिबान्यांशी चर्चा करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 17:06 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान्यांशी बातचीत करण्यास नकार दिला आहे. भारतासाठी हे चांगले संकेत आहेत.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान्यांशी बातचीत करण्यास नकार दिला आहे. भारतासाठी हे चांगले संकेत आहेत. दहशतवाद्यांशी कोणत्याही प्रकारच्या चर्चेच्या भारत विरोधात आहे. तालिबान्यांशी चर्चा  करण्याच्या पाकिस्तान, चीन आणि रशियाच्या विरोधात आता अमेरिका उभा राहिला आहे. अफगाणिस्तानच्या विषयावर पाकिस्तान, चीन आणि रशिया भारताला सहभागी करून घेऊ इच्छित नाही. कारण भारत दहशतवाद्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करायची नाही, या भूमिकेवर ठाम आहे.तालिबाननं हिंसेचा मार्ग सोडून अफगाणिस्तानच्या संविधानाचा स्वीकार करून अल कायदाशी सर्व संबंध तोडले पाहिजेत. भारत याला रेड लाइन्स असे संबोधतो. तालिबाननं अफगाणिस्तानच्या अटी मान्य केल्या तरच त्यांच्याशी चर्चा शक्य आहे. तरीही याचा निर्णय अफगाणिस्ताननं केला पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 16 वर्षांपासून अशांती पसरली आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानही भारतासारखी रेड लाइन्स अटीसंदर्भात भूमिका आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये शांती नांदावी, अशी भारताची इच्छा आहे. तर दोन दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या सहा नेत्यांवर निर्बंध आणत पाकिस्तानला जबर हादरा दिला होता. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध एकजुटीने काम करण्याचे वचन पाळत अतिरेक्यांना आश्रय आणि पैसा पुरविणे थांबवावे, यासाठीही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दबाव वाढविला आहे. अब्दुल समद सानी, अब्दुल कादीर बासीर अब्दुल बासीर, हाफिज मोहम्मद पोपलजई आणि मौलवी इनायतुल्ला या तालिबानच्या चार तसेच हक्कानी नेटवर्कचे फाकिर मोहम्मद आणि गुला खान हामिदी अशा दोन प्रमुखांवर निर्बंध आणतानाच अमेरिकेच्या वित्त विभागाने त्यांना जागतिक दहशतवादी घोषित केले आहे.हक्कानी नेटवर्क अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांचे अपहरण आणि हल्ल्यांमध्ये गुंतला होता. भारताविरुद्धही त्याने घातक कारवाया केल्या आहेत. काबूलमध्ये 2008 साली भारतीय मिशनवर झालेल्या हल्ल्यात 58 लोक मारले गेले होते. नववर्षातील आपल्या पहिल्याच टि्वटमध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानवर खोटारडेपणाचा आणि अमेरिकेला धोका दिल्याचा आरोप केला होता. अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दिलेली मदत म्हणजे मूर्खपणा होय, असे विधानही त्यांनी केले.अमेरिकेच्या अखत्यारित असलेल्या या सहाही दहशतवाद्यांची संपूर्ण संपत्ती जप्त केली जाणार असून, त्यांची अमेरिकन नागरिकांसोबतची आर्थिक देवाण-घेवाण थांबविली जाईल. अमेरिकन मित्र फौजांवरील हल्ले, तस्करी आणि अतिरेकी गटांचे आर्थिक पोषण करण्यात सहभागी असलेल्या तालिबान आणि हक्कानी नेटवर्कशी संलग्न सहा नेत्यांवर प्रतिबंध आणल्याची घोषणा दहशतवाद आणि वित्त गुप्तचर विभागाचे अवर सचिव सिगल मंडेलकर यांनी केली आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका