काठमांडू :नेपाळमधील ‘जेन-झी’च्या आंदोलनांमुळे के.पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी, शुक्रवारी बालेंद्र शाह ‘बालेन’ यांनी नेपाळचे ४७वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे (आरएसपी) ३५ वर्षीय रॅपर ते राजकारणी असा प्रवास केलेले बालेन यांनी शीतल निवास येथील राष्ट्रपती कार्यालयात दुपारी १२:३४ वाजता शुभ मुहूर्तावर शपथ घेतली. बालेन हे नेपाळमधील सर्वांत तरुण लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते आणि पंतप्रधानपद भूषवणारे मधेस प्रदेशातील पहिले व्यक्ती आहेत.
घटनेच्या कलम ७६ (१) नुसार, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी शुक्रवारी त्यांची ४७ वे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. काठमांडूच्या या माजी महापौरांनी ओली यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत आरएसपीने प्रतिनिधी सभेच्या २७५ पैकी १८२ जागा जिंकल्या आहेत.
मोदींकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे नवे पंतप्रधान बालेंद्र शाह यांचे अभिनंदन केले. एक्सवरील एका संदेशात मोदी म्हणाले, नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल बलेंद्र शाह यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमची नियुक्ती नेपाळच्या जनतेने तुमच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
Web Summary : Balen Shah, a 35-year-old rapper-turned-politician, became Nepal's 47th Prime Minister. He is the youngest and first Madhesi leader to hold the office. He defeated K.P. Sharma Oli, with his party winning 182 seats. PM Modi congratulated Shah on his appointment.
Web Summary : 35 वर्षीय रैपर-राजनेता बालेन शाह ने नेपाल के 47वें प्रधानमंत्री के रूप में शपथ ली। वह सबसे कम उम्र के और पहले मधेसी नेता हैं जिन्होंने यह पद संभाला है। उन्होंने के.पी. शर्मा ओली को हराया, उनकी पार्टी ने 182 सीटें जीतीं। पीएम मोदी ने शाह को उनकी नियुक्ति पर बधाई दी।