लंडन : लंडनमध्ये गेल्या १६ वर्षांपासून अस्सल भारतीय चवीचे पदार्थ देणारे 'रंगरेझ' हे रेस्टॉरंट आता कायमचे बंद होणार आहे. रेस्टॉरंटचे मालक हरमन सिंह कपूर यांनी अत्यंत जड अंतःकरणाने हा निर्णय घेतला असून, यासाठी त्यांनी पाकिस्तानी लोकांकडून होणारा सातत्यपूर्ण छळ आणि 'ऑनलाइन हॅरासमेंट' कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
हरमन सिंह कपूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. त्यांनी आरोप केला की, गेल्या काही काळापासून काही विशिष्ट पाकिस्तानी गटांकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या रेस्टॉरंटच्या नावाने इंटरनेटवर खोटे रिव्ह्यू देणे, त्यांना धमकावणे आणि रेस्तरांमध्ये येऊन गोंधळ घालणे अशा प्रकारांमुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
कपूर यांनी आपल्या पोस्टमध्ये लंडनच्या 'मेट्रोपॉलिटन पोलीस' दलावरही ताशेरे ओढले आहेत. सततच्या हल्ल्यांनंतर आणि त्रासानंतरही स्थानिक प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नाही, ज्यामुळे सुरक्षितपणे व्यवसाय करणे आता अशक्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. वाढत्या खर्चासोबतच या मानसिक त्रासामुळे त्यांना हैमरस्मिथ येथील हे लोकप्रिय हॉटेल पुढच्या महिन्यापासून बंद करावे लागत आहे.
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया१६ वर्षांच्या या प्रवासात 'रंगरेझ'ने अनेक खवय्यांची मने जिंकली होती. हे रेस्तरां बंद होत असल्याचे ऐकून अनेक भारतीयांनी आणि स्थानिक ग्राहकांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच, परदेशात भारतीय व्यावसायिकांना अशा प्रकारे लक्ष्य केले जाणे चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
Web Summary : London's Rangrez restaurant, known for Indian cuisine, is closing after 16 years due to persistent harassment and online attacks by Pakistani groups. The owner, Harman Singh Kapoor, cited a lack of police support amidst the threats and disruptions, making continued operation impossible.
Web Summary : लंदन का रंगरेज रेस्तरां, जो भारतीय व्यंजनों के लिए जाना जाता है, पाकिस्तानी समूहों द्वारा लगातार उत्पीड़न और ऑनलाइन हमलों के कारण 16 साल बाद बंद हो रहा है। मालिक हरमन सिंह कपूर ने धमकियों और व्यवधानों के बीच पुलिस समर्थन की कमी का हवाला दिया, जिससे संचालन असंभव हो गया।