शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन पोलीस भारतीय व्यक्तीच्या शोधात; माहिती देणाऱ्याला मिळणार 5 कोटींचे बक्षीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 09:44 IST

आरोपीला शोधून देणाऱ्याला किंवा त्याबद्दल माहिती सांगणाऱ्याला 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर (5 कोटींहून अधिक) बक्षीस जाहीर केले आहे.

ऑस्ट्रेलियातील पोलीस एक भारतीय व्यक्तीच्या शोधात आहेत. ऑस्ट्रेलियात 24 वर्षीय तरुणीची हत्या केल्यानंतर तेथून पळून गेलेल्या भारतीय व्यक्तीचा ऑस्ट्रेलियन पोलीस सक्रियपणे शोध घेत आहेत. इतकंच नाही तर पोलिसांनी आता आरोपीला शोधून देणाऱ्याला किंवा त्याबद्दल माहिती सांगणाऱ्याला 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर (5 कोटींहून अधिक) बक्षीस जाहीर केले आहे. बक्षीस जाहीर झाल्यानंतर आरोपींचा शोध घेणे सोपे होईल, असे पोलिसांना वाटते.

दरम्यान, या हत्येची घटना ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये घडली आहे. 24 वर्षीय टोयाह कॉर्डिंगले ही 2018 मध्ये क्वीन्सलँड बीचवर तिच्या कुत्र्याला फिरवत होती. यादरम्यान राजविंदर सिंग नावाच्या व्यक्तीने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेला चार वर्षे उलटून गेली तरी ऑस्ट्रेलियन पोलिसांना आरोपीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी आरोपींवर मोठे बक्षीस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी राजविंदर सिंग किंवा त्याचा ठावठिकाणाविषयी माहिती मिळाल्यावर नागरिकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे क्वीन्सलँड पोलिसांना माहिती देण्याची विनंती केली आहे. तसेच, पोलिसांनी असेही म्हटले आहे की जर ऑस्ट्रेलियातील कोणत्याही व्यक्तीला आरोपीबद्दल माहिती मिळाली तर ते थेट 1800-333-000 वर कॉल करू शकतात.

ज्या कोणाला राजविंदर सिंगबद्दल माहिती असेल तो क्वीन्सलँड पोलिसांशी संपर्क साधेल, असेही पोलिसांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 38 वर्षीय राजविंदर क्वीन्सलँडमध्ये मेल नर्स म्हणून काम करत होता. टोयाह कॉर्डिंगलेच्या हत्येनंतर दोन दिवसांनी तो ऑस्ट्रेलियातून पळून गेला. पळून जाताना त्याने पत्नी आणि तीन मुलांचा विचारही केला नाही, त्यांना ऑस्ट्रेलियात सोडून गेला.

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी सांगितले की, हत्येनंतर 22 ऑक्टोबर रोजी राजविंदर सिडनीला गेला आणि तेथून विमानाने भारतात पोहोचला. भारतात तो पोहचल्याची पुष्टी सुद्धा करण्यात आली आहे. राजविंदर हा पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील बुट्टर कलानचा रहिवासी आहे. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी बक्षीस जाहीर करण्यासोबतच भावनिक आवाहन केले आहे. दरम्यान,ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाPoliceपोलिस