शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

भूतानच्या जेत्सुन जगातील सर्वात लहान आणि तरुण महाराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 11:58 IST

सोशल मीडियावरील फोटो पाहता भूतानच्या या महाराणी जगातील सर्वात लहान आणि सुंदर महाराणी असल्याचं दिसतंय.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी भूतानच्या चिमुकल्या राजकुमाराची खास वेळ काढून भेट घेतली होती.या राजकुमाराची आई या जगातील सगळ्यात लहान आणि तरुण महाराणी असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत.त्या वयाच्या २१ व्या वर्षी महाराणीच्या गादीवर विराजमान झाल्या होत्या.आणि आता त्या २७ वर्षांच्या आहेत.

भुतान : काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी एका राजकुमाराला भेटले होते. भुतानचे राजे भारत दौऱ्यावर आले असताना या छोट्या राजकुमाराला भेटण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास वेळ काढला होता. हे इथं आ‌ठवण करून द्यायचं कारण असं की, या राजकुमाराची आई म्हणजेच जेत्सुन पेमा वांगचूक या जगातील सगळ्यात लहान आणि तरुण महाराणी असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. 

आरव्हीजेसी या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, जेत्सुन पेमा वांगचूक या वयाच्या २१ व्या वर्षी महाराणीच्या गादीवर विराजमान झाल्या होत्या. २०११ साली त्यांनी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्याशी विवाह केला होता. त्या आता २७ वर्षांच्या आहेत. त्या भारतात येऊन गेल्यानंतर अनेक नेटिझन्सने त्यांना सोशल मीडियावर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या इन्स्टाग्रामवर सक्रीय असल्याचं दिसून आलं. एवढंच नव्हे तर जेत्सुन पेमा यांचा भारताशीही संबंध आहे. शिक्षणासाठी त्या वर्षभर पश्चिम बंगालमध्येही राहिल्या होत्या. म्हणूनच भारत दौऱ्यावर आले असताना त्यांना महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं होतं.

 

महाराणी जेत्सुन आणि राजा वांगचुक यांच्यात जवळपास १० वर्षांचं अंतर आहे. भुतानमध्ये जन्माला आलेल्या जेत्सुन यांनी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतलं आहे. पण लंडनला जाण्याआधी त्या भारतात वर्षभर शिक्षण घेत होत्या. पश्चिम बंगालच्या सेंट जोसेफ कॉन्वेंट शाळेत त्या शिकल्या आहेत. त्यानंतर हिमाचलमधील एका महाविद्यालयात बारावीपर्यंतच शिक्षण त्यांनी घेतलं. भुतानच्या या महाराणीला हिंदी भाषाही येत असल्याचीही माहिती समोर येतेय. तसंच, इंग्रजी भाषेवरही त्यांचं प्रभुत्व आहे. लंडनहून शिक्षण घेऊन भुतानमध्ये परतलेल्या जेत्सुन यांनी राजा वांगचूक  यांच्याशी लग्न केलं. जेत्सुन यांचे वडिल वैमानिक आहेत.  

त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून असं दिसतंय की त्यांना भुतानचा पारंपारिक वेशच परिधान करायला जास्त आवडतो. लंडनमध्ये उच्च  शिक्षण घेतलेल्या महाराणीला आपला पारंपारिक वेश परिधान करायला आवडतो यावरून नेटिझन्सने त्यांचं कौतुकही केलंय. इन्स्टाग्रामवर त्यांचे जवळपास ७० हजाराहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी महाराणी पदावर विराजमान झालेल्या या राणीला जगातील सगळ्यात तरुण राणी म्हणूनही संबोधलं जातं. 

आणखी वाचा - भूतानच्या चिमुकल्या राजकुमारासोबत रमल्या सुषमा स्वराज

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत