भारताचा शेजारी आणि कट्टर भारतविरोधी देश असलेल्या पाकिस्तानमध्ये अप्रत्यक्ष सत्ता ही लष्कराचीच असते हे सर्वश्रुत आहे. पाकिस्तानमधील बहुतांश व्यवस्था पाहणाऱ्या पाकिस्तानी सैन्यदलाबाबत नेहमीच वेगवेगळ्या कहाण्या समोर येत असतात. आता एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे पाकिस्तानी लष्करावर मोठी नामुष्की ओढवली आहे. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा हे गंभीर दुखापतीमुळे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाजवा यांना काही सैनिकांनी बेदम मारहाण केल्याची कुजबूज सुरू आहे. मात्र पाकिस्तानी लष्कर आणि बाजवा यांच्या कुटुंबीयांनी ते बाथरूममध्ये घसरून पडल्याची सारवासारव केली आहे.
ही घटना १० फेब्रुवारी रोजी पहाटे साडे चारच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. आयएसपीआर आणि कुटुंबीयांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जनरल बाजवा हे बाथरूममध्ये घसरून पडले. तसेच त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना रावळपिंडी येथील कंबाईंड मिलिट्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या घटनेने पाकिस्तानी सैन्यामध्ये उफाळत असलेल्या अंतर्गत असंतोषाला उघड केले आहे.
या घटनेबाबत जनरल बाजवा यांचे मेहुणे नईम घुम्मन यांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा बाजवा हे अनवानी पायांनी जात होते तेव्हाच ते बाथरूममध्ये घसरून पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर आयएसपीआरने हा एक अपघात असून, त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले.
बाजवा यांचे कुटुंबीय आणि पाकिस्तानी लष्कराकडून काहीही सारवासारव केली जात असली तरी ही बाथरूममध्ये घसरून पडल्याने घडलेली दुर्घटना नाही, असा दावा गुप्तचर सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीमधून करण्यात येत आहे. जनरल बाजवा यांना तीन सैनिकांनी पकडले आणि गंभीर दुखापत होईपर्यंत मारहाण केली आहे, असा दावा केला जात आहे.
सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार २०२२मध्ये इम्रान खानचं सरकारा पाडण्यात आलं तेव्हा सत्तांतराला विरोध करत असलेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करण्याचे आदेश जनरल बाजवा यांनी दिले होते. आता त्यामधूनच हा हल्ला तेव्हाच्या पीडित अधिकाऱ्यांचे कुटुंबीय किंवा कनिष्ठ सैनिकांनी केला, असावा असा दावा केला जात आहे.
Web Summary : Former Pakistan Army Chief General Bajwa is reportedly hospitalized with injuries. While officials claim a bathroom fall, sources suggest a possible assault by soldiers linked to past grievances over the ousting of Imran Khan's government. The incident highlights internal discord within the Pakistani military.
Web Summary : पाकिस्तान के पूर्व सेना प्रमुख जनरल बाजवा कथित तौर पर चोटों के साथ अस्पताल में भर्ती हैं। अधिकारियों ने बाथरूम में गिरने का दावा किया, लेकिन सूत्रों ने इमरान खान की सरकार को हटाने को लेकर पिछली शिकायतों से जुड़े सैनिकों द्वारा संभावित हमले का सुझाव दिया। घटना पाकिस्तानी सेना के भीतर आंतरिक कलह को उजागर करती है।