शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात मोठा वाद! विद्यार्थी रस्त्यावर; सहा जणांचा मृत्यू, शाळा-कॉलेज बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 11:52 IST

protest against reservation in bangladesh : यावर बोलताना शेख हसिना म्हणाल्या, यासंदर्भातील सर्व निर्णय आपल्या हातात आहे. बांगलादेशात ३०% नोकऱ्या युद्ध वीरांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशातही वाद पेटला आहे. या वादात आतापर्यंत किमान 6 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून आरक्षण संपवण्याची मागणी करत आहेत. या आंदोलनाने आता हिंसक रूप घेतले आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 400 हून अधिक जखमी झाल्याचे समजते. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, बुधवार सायंकाळी या आंदोलनाला सुरुवात झाली.  

दरम्यान, विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत एका मुलासह 6 जणांना गोळी लागली आहे. सुरक्षा दलांच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थ्यांनी गुरुवारी देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. आंदोलन प्रमुख आसिफ महमूदने म्हटले आहे की, रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा वगळता सर्व बंद राहील. याशिवाय, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसाचारात मृत्यू झालेल्यांबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती स्थापन केली जाईल, असेही म्हटले आहे.

का भडकलं आंदोलन? -बांगलादेशात 1971 च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दिले जाणारे आरक्षण रद्द करण्यासाठी हे आंदोलन होत आहे. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने आठवड्याभरापूर्वी या आरक्षणावर बंदी घातली होती. मात्र, पंतप्रधान शेख हसीना यांनी त्याची अंमलबजावणी होऊ दिली नाही. यामुळे विद्यार्थ्यी रस्त्यावर उतरले आहेत. यावर बोलताना शेख हसिना म्हणाल्या, यासंदर्भातील सर्व निर्णय आपल्या हातात आहे. बांगलादेशात ३०% नोकऱ्या युद्ध वीरांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामुळेच विद्यार्थी भडकले आहेत. कारण मेरिटच्या आधारावर नोकऱ्या मिळाव्यात अशी मागणी विदयार्थ्यांकडून केली जात आहे.

विद्यार्थ्यांना चिथावण्यात आले आहे -याचवेळी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, या विद्यार्थ्यांना चिथावण्यात आले आहे. यासाठी त्यांनी काही स्वार्थी घटकांना जबाबदार धरले आहे. तसेच उपद्रवी मंडळी या स्थितीचा फायदा घेतील, अशी कोणतीही कृती विद्यार्थ्यांनी करू नये. असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशreservationआरक्षणStudentविद्यार्थीSoldierसैनिकjobनोकरी