शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Lars Vilks dead: मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढणारे लार्स विल्क्स यांचा अपघाती मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 20:31 IST

Lars Vilks death: फ्रान्सचे मॅगझीन चार्ली हेब्दोमध्ये देखील पैगंबरांवरील आक्षेपार्ह कार्टून छापण्यात आले होते. यानंतर लार्स यांनी संरक्षण मागितले होते.

स्टॉकहोम : मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढणारे स्वीडनचे व्यंगचित्रकार लार्स विल्क्स (Lars Vilks) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यापूर्वी ते दोनवेळा अपघातातून वाचले होते. 14 वर्षांपूर्वी त्यांनी पैगंबरांचे व्यंगचित्र काढले होते. त्यानंतर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. दोनदा ते हल्ल्यातून वाचले होते. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. (Swedish cartoonist Lars Vilks dies in car accident) 

रविवारी पोलीस संरक्षणात पोलिसांच्या कारमधून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकची कारला धडक बसली. यामध्ये विल्क्स यांचा मृत्यू झाला. विल्क्स यांच्यासह पोलीस वाहनात असणाऱ्या दोन पोलिसांचा देखील मृत्यू झाला आहे. स्वीडनच्या क्रोनोबर्गमध्ये हा अपघात झाला. ट्रक ड्रायव्हर जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. लार्स यांनी 2007 मध्ये मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र त्यांनी काढले होते. यामुळे त्यांच्यावर दोनवेळा हल्ले झाले होते. 2011 मध्ये एका व्यक्तीने आपला गुन्हा कबुल केला होता. त्याला 2014 मध्ये शिक्षा ठोठावण्यात आली होती. यानंतर 2015 मध्ये दुसरा हल्ला झाला होता. 

फ्रान्सचे मॅगझीन चार्ली हेब्दोमध्ये देखील पैगंबरांवरील आक्षेपार्ह कार्टून छापण्यात आले होते. यानंतर लार्स यांनी संरक्षण मागितले होते. रविवारी झालेल्या दुर्घटनेकडे सध्यातरी अपघाताच्या नजरेने पाहिले जात आहे. तरीदेखील पोलीस घातपाताच्या दिशेने चौकशी करत आहेत. प्रत्यक्षदर्शींनुसार ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीचा वेग खूप जास्त होता. 

एका व्यक्तीने स्थानिक मीडियाला सांगितले की, असे वाटले की पोलिसांच्या गाडीचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरील दुसऱ्या बाजुला समोरून येणाऱ्या गाडीवर जाऊन आदळली. मोठ्या आवाजानंतर दोन्ही गाड्यांना आग लागली. 

टॅग्स :Cartoonistव्यंगचित्रकारAccidentअपघात