शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

बाबो! दुबईच्या शासकाला महागात पडला घटस्फोट, सहावी पत्नी हयाला द्यावे लागतील इतके कोटी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 12:05 IST

Mohammed bin Rashid Al Maktoum and Haya bint Hussein Divorce : संयुक्त अरब अमीरातचे पंतप्रधान आणि दुबईचे अब्जाधीश उद्योगपती शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूस आणि त्यांची सहावी पत्नी राहिलेली राजकुमारी हया यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे.

दुबईचा (Dubai Royale Family) शाही परिवार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संयुक्त अरब अमीरातचे पंतप्रधान आणि दुबईचे अब्जाधीश उद्योगपती शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूस ((Mohammed bin Rashid Al Maktoum) आणि त्यांची सहावी पत्नी राहिलेली राजकुमारी हया यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. ब्रिटनच्या एका कोर्टाने यासंबंध निर्णय सुनावला आहे. त्यानुसार दुबईच्या शासकाला राजकुमारी हयाला (Haya bint Hussein) ५५ कोटी पाउंडची मोठी रक्कम देण्याचा आदेश सुनावला आहे. 

भारतीय करन्सीनुसार ही रक्कम साधारण ५५०० कोटी रूपये इतकी होती. ब्रिटनच्या कायद्याच्या इतिहासात घटस्फोटाची ही सर्वात घटना मानली जात आहे. ब्रिटन हायकोर्टाने मंगळवारी यासंबंधी निर्णय सुनावला. ज्यात कोर्टाने सांगितलं की, राजकुमारी हया आणि तिच्या मुलांना दहशतवाद किंवा अपहरण अशा धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी. जॉर्डनचे माजी राजा हुसैन बिन तलाल यांची ४७ वर्षीय मुलगी राजकुमारी हया बिंत अल-हुसैन दुबईचा शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम(७२) याची सहावी आणि सर्वात लहान पत्नी होती.

२००४ मध्ये झाला होता निकाह

दुबईचा शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम सोबत तिचा निकाह २००४ मध्ये झाला होता. त्यावेळी त्याच्या आधीच पाच पत्नी होत्या. राजकुमारी हया आणि दुबईच्या शासकाला दोन मुलंही आहेत. मुलीचं वय १४ तर मुलगा ९ वर्षांचा आहे. शेखची सहावी पत्नी राजकुमारी हया एप्रिल २०१९ मध्ये अचानक दोन्ही मुलांसह दुबई सोडून ब्रिटनला पळून आली होती. तिथे तिने तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले. ती म्हणाली होती की, तिच्या जीवाला धोका आहे.

जॉर्डनची राजकुमारी हयाचा जन्म याच देशात झाला होता. पण ती केवळ तीन वर्षांची असताना एका हेलिकॉप्टर अपघातात तिच्या आईचं निधन झालं होतं. ज्यानंतर ती ब्रिटनमध्ये लहानाची मोठी झाली. इथे तिने ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीतून राज्यशास्त्र, अर्थशास्त्राचा अभ्यास केला. तिला दुबईतील बंदीस्त जीवन पसंत नव्हतं. अखेर आता त्यांचा घटस्फोट झाला. 

टॅग्स :DubaiदुबईUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीDivorceघटस्फोट