शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

प्रिन्स हॅरी, मेगन यांनी केला राजघराण्यापासून वेगळे होण्याचा करार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 4:15 AM

ब्रिटनचे प्रिन्स हॅरी (३५) व त्यांची पत्नी मेगन मर्केल (३८) यांनी राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या करारावर सही केली असून, त्याअंतर्गत आता ‘हिज आणि हर रॉयल हायनेस’ (एचआरएच) या उपाधीही सोडल्या आहेत.

लंडन  - ब्रिटनचे प्रिन्स हॅरी (३५) व त्यांची पत्नी मेगन मर्केल (३८) यांनी राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या करारावर सही केली असून, त्याअंतर्गत आता ‘हिज आणि हर रॉयल हायनेस’ (एचआरएच) या उपाधीही सोडल्या आहेत. याचबरोबर त्यांना त्यांच्या कर्तव्यपालनासाठी आता सार्वजनिक निधीचा वापरही करता येणार नाही. या कराराचा आणखी असाही एक अर्थ आहे की, हे दाम्पत्य आता ब्रिटनच्या महाराणीचे अधिकृतरीत्या प्रतिनिधित्व करीत नाही.बकिंगहॅम पॅलेसने एका निवेदनात म्हटले आहे की, ड्यूक आणि डचेज आॅफ ससेक्स हे राजघराण्याचा भाग नसल्यामुळे त्यांना आता एचआरएच उपाधींचा वापर करता येणार नाही. मात्र, राजघराण्याची मूल्ये ते कायम ठेवणार आहेत. तसेच हे दाम्पत्य खाजगी संघटनांशी जोडलेले राहणार आहेत.९३ वर्षीय ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी निवेदनात म्हटले आहे की, हॅरी, मेगन व त्यांचा मुलगा आर्ची हे आमच्या कुटुंबातील प्रिय सदस्य राहिलेले आहेत.त्यांच्याशी मागील अनेक महिने चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. माझा नातू व त्याचे कुटुंब वेगळे पाऊल टाकत असून, हे रचनात्मक व सहयोगात्मक पद्धतीने सुरू आहे. असे असले तरी या दाम्पत्यासमोर येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करीत त्यांच्या स्वतंत्र जीवन जगण्याच्या इच्छेला पाठिंबा दर्शवते.महाराणींनी म्हटले आहे की, मला विशेषत: मेगनचा अभिमान वाटतो. ती खूपच लवकर आमच्या कुटुंबामध्ये मिसळली होती. या करारामुळे दाम्पत्याला पुढील जीवन आनंदात व शांततापूर्ण पद्धतीने जगण्याची संधी मिळाली आहे. त्यांना माझ्या कुटुंबाच्या शुभेच्छा आहेत.विंडसर कॅसलस्थित फ्रोगमोर कॉटेडच्या दुरुस्तीवर खर्च झालेले २४ लाख पाऊंड हे दाम्पत्य परत करणार आहेत. हे त्यांचे कौटुंबिक घर असेल. ते ब्रिटन व कॅनडामध्ये वास्तव्य करतील. मात्र, त्यांची सुरक्षा व्यवस्था व भविष्यातील खर्च कोण करणार, याबाबत टिप्पणी करण्यास पॅलेसच्या सूत्रांनी नकार दिला आहे.ब्रिटनमध्ये चर्चा हार्ड मेक्झिटचीहॅरी व मेगन यांनी राजघराण्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले होते. विशेष म्हणजे या दोघांनी महाराणीशी सल्लामसलत केल्याशिवायच हा निर्णय घेतला होता. संपूर्ण ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटची (ब्रिटनच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याची) चर्चा सुरू असताना या घटनेला काही जण हार्ड मेक्झिट असेही संबोधत आहेत. 

टॅग्स :Englandइंग्लंडInternationalआंतरराष्ट्रीय