शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान मिळाला, दोन्ही देशांमध्ये संरक्षणासह महत्वाचे करार झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:38 IST

श्रीलंकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. २०१९ नंतर पहिल्यांदात पीएम मोदी श्रीलंकेला गेले आहेत.श्रीलंकेने त्यांचे जोरदार स्वागत केले. श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींना श्रीलंका मित्र विभूषणाया हा सर्वोच्च गैर-नागरी सन्मान प्रदान केला. 

या सन्मानानंतर पंतप्रधान मोदी यांनी 'हा १४० कोटी भारतीयांसाठी सन्मान असल्याचे म्हटले आहे . पीएम मोदींनी श्रीलंकेचे राष्ट्रपती, सरकार आणि जनतेचे आभार मानले आहेत.

"आरएसएसला ख्रिश्चनांकडे वळण्यास फार वेळ लागला नाही"; राहुल गांधींची पोस्ट, मुद्दा काय?

मित्र विभूषणय हा श्रीलंकेतील सर्वोच्च बिगर-नागरी सन्मान आहे. हा सन्मान परदेशी मान्यवरांना दिला जातो. श्रीलंकेशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या राष्ट्रप्रमुखांना श्रीलंका सरकार हे पुरस्कार देते. या पुरस्कारात रौप्य पदक आणि प्रशस्तिपत्र दिले जाते.हे पदक श्रीलंकेच्या नऊ रत्नांनी सजवले आहे. यात चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि कमळाच्या पाकळ्या बनवलेल्या आहेत. पदकावर "पुन कलसा" कोरलेले आहे. ते भाताने भरलेले भांडे असते. हे समृद्धी आणि नूतनीकरणाचे प्रतीक मानले जाते. पदकावरील सूर्य आणि चंद्र हे भारत आणि श्रीलंकेतील शाश्वत संबंधांचे प्रतिनिधित्व करतात. हा पुरस्कार २००८ मध्ये श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी सुरू केला होता.

दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार झाले

शनिवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके आणि पंतप्रधान मोदी यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये सात करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षण भागीदारी करार झाला. दोन्ही नेत्यांनी करारावर स्वाक्षरी केली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

दोन्ही देशांमध्ये त्रिंकोमालीला ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी एक करारही झाला. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती दिसानायके यांनी समपूर सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. भारत आणि श्रीलंकेने श्रीलंकेला बहु-क्षेत्रीय अनुदान सहाय्य देण्यावरही सहमती दर्शविली आहे.

दुसरीकडे, भारत, संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा