फिलिपिन्सच्या अध्यक्षांची बराक ओबामांना आईवरुन शिवी

By Admin | Updated: September 6, 2016 11:07 IST2016-09-06T08:51:41+5:302016-09-06T11:07:49+5:30

फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आईवरुन शिवी घातली आहे. या वक्तव्यामुळे व्हाईट हाऊसने बराक ओबामांसोबत होणारी प्रस्तावित भेट रद्द केली आहे.

The President of the Philippines, Barak Obama, Ivaron Shivi | फिलिपिन्सच्या अध्यक्षांची बराक ओबामांना आईवरुन शिवी

फिलिपिन्सच्या अध्यक्षांची बराक ओबामांना आईवरुन शिवी

>- ऑनलाइन लोकमत
मलीना, दि. 6 - जगातील बलाढ्य देशांच्या यादीत आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फिलिपिन्सच्या अध्यक्षांनी चक्क शिवी हासडली आहे. फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आईवरुन शिवी घातली आहे. रॉड्रिगो डुटर्टे यांच्या या वक्तव्यामुळे व्हाईट हाऊसने बराक ओबामांसोबत होणारी प्रस्तावित भेट रद्द केली आहे.  
 
व्हाईट हाऊसने काही दिवसांपुर्वी बराक ओबामा फिलिपिन्समध्ये ड्रग्ज तस्करांना ज्याप्रकारे हाताळलं जात आहे त्यासंबंधी अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये ड्रग तस्करांना देण्यात येणा-या मृत्यूदंडांवरही चर्चा केली जाणार होती. मात्र यामुळे संतापलेल्या रॉड्रिगो डुटर्टे यांनी बराक ओबामांवर आगपाखड करत खालच्या स्तरावर जाऊन शिवी घालत आपला संताप व्यक्त केला आहे. 
 
'ओबामांना काय वाटतं, कोण आहेत ते ? मी अमेरिकेच्या हातचं बाहुलं नाही. मी एका स्वतंत्र देशाचा अध्यक्ष असून मी फक्त फिलिपिन्स जनतेला उत्तर देण्यास बांधिल आहे', असं वक्तव्य रॉड्रिगो डुटर्टे यांनी केलं आहे.
बराक ओबामा आणि रॉड्रिगो डुटर्टे यांची लाओस येथे आशियाई नेत्यांच्या बैठकीत भेट होणं अपेक्षित होतं. मात्र ही भेट आता रद्द करण्यात आली आहे. 
रॉड्रिगो डुटर्टे 30 जून रोजी फिलिपिन्सच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. सत्तेवर येताच त्यांनी एक लाख ड्रग्ज तस्करांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंड देणार असल्याची घोषणा केली. हे वचन पूर्ण करण्यासाठी डुटर्टे यांनी आतापर्यंत 2400 जणांना मृत्यूदंड दिला आहे. यामुळे मानवाधिकारांचं उल्लंघन झालं असल्याचं सांगत त्यांच्यावर टीकादेखील होत आहे.
 
 
रॉड्रिगो डुटर्टे यांनी मागितली माफी - 
अपशब्द वापरल्यानंतर रॉड्रिगो डुटर्टे यांच्यावर झालेल्या टीकेनंतर त्यांनी माफी मागत अपशब्द वापरल्याबद्दल खेद व्यक्त केला. 

Web Title: The President of the Philippines, Barak Obama, Ivaron Shivi