शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

George Floyd Death: व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचली विरोधाची 'आग'; ट्रम्प यांना बंकरमध्ये घ्यावी लागली 'शरण'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 9:30 AM

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध शहरात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांसाठी डाव्यांना जबाबदार धरले आहे. यामुळे निर्दोष लोक भयभीत झाले आहेत. निदर्शक उद्योग धंद्यांचेही नुकसान करत आहेत. इमारती जाळत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. 

ठळक मुद्देजॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर कृष्णवर्णीय समुदायाची निदर्शने अधिक तीव्र होताना दिसत आहेत. अमेरिकेतील तब्बल 30 शहरे हिंसेच्या आगीत होरपळत आहेत.अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध शहरात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांसाठी डाव्यांना जबाबदार धरले आहे.

वॉशिंग्टनः जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर कृष्णवर्णीय समुदायाची निदर्शने अधिक तीव्र होताना दिसत आहेत. यामुळे अमेरिकेतील तब्बल 30 शहरे हिंसेच्या आगीत होरपळत आहेत. याची झळ रविवारी व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचली. राजधानी वाशिंग्टनमध्ये तर परिस्थिती एवढी चिघळली आहे, की महापौरांनी रात्री 11 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यूची घोषणा केली आहे. तसेच, व्हाइट हाऊसजवळ सलग तिसऱ्या दिवशीही निदर्शन सुरूच होते.

व्हाइट हाऊस परिसराद तणाव -व्हाइट हाऊसजवळ निदर्शन करत असलेल्या जमावाने तेथील कचऱ्याला आग लावली आणि पोलिसांनाही धक्काबुक्की केली. येथील परिस्थिती एवढी चिघळली, की तेथे तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजन्ट्स राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये असलेल्या संरक्षण बंकरमध्ये घेऊन गेले. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी व्हाइट हाऊसजवळील निदर्शकांना हुसकावले.

सीक्रेट सर्व्हिस एजन्ट्सनी परिधान केला दंगल विरोधी पोशाख -रविवारीही व्हाइट हाऊसपरिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शन करणाऱ्या लोकांना हुसकावण्यासाठी तेथील सिक्रेट सर्व्हिस एजन्ट्सना रॉयट गिअर (दंगलविरोधी पोशाख) परिधान  करावा लागला. कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील अनेक शहरांत  शुक्रवारपासून हिंसक निदर्शने होत आहेत. यापैकी काही निदर्शनांनी आक्रमक रूप धारण केले आहे. तसेच पोलिसांसोबतही निदर्शकांची बाचाबाची झाल्याची माहिती आहे.

ट्रम्प यांनी डाव्यांना धरले जबाबदार -अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध शहरात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांसाठी डाव्यांना जबाबदार धरले आहे. यामुळे निर्दोष लोक भयभीत झाले आहेत. निदर्शक उद्योग धंद्यांचेही नुकसान करत आहेत. इमारती जाळत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. 

बनावट नोट चालविण्याचा प्रयत्नजॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाने २० डॉलरची एक बनावट नोट एका दुकानात चालविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. जॉर्जला त्याच्या कारमधून उतरायला सांगितल्यानंतर त्याने पोलिसांशी हुज्जत घातली व झटापटही केली, असे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी रस्त्यावरून जाणाºयांपैकी कोणीतरी या घटनेचे मोबाईल फोनमधून चित्रीकरण केले.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिकाUnited Statesअमेरिका