शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:40 IST

ऑपरेशन्स आणि प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर चर्चा करण्यात आली आहे.

एथेंस - ऑपरेशन सिंदूरमध्येभारताविरोधातपाकिस्तानची मदत करणाऱ्या तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी भारताने केली आहे. तुर्कीविरोधात भारताने ऑपरेशन सुरू झालंय का असा सवाल विचारला जात आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख अमरप्रित सिंग हे सध्या ग्रीस दौऱ्यावर गेले आहेत. ग्रीस आणि तुर्की यांच्यातील संबंध नेहमीत तणावात राहिले आहेत. त्यामुळे तुर्कीला धडा शिकवण्यासाठी भारताने ग्रीसला सैन्य सहकार्य केले पाहिजे अशी दीर्घ काळापासून मागणी होत आहे. ग्रीस पोहचताच भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांचे स्वागत हेलेनिक एअरफोर्सचे चीफ लेफ्टिनंट जनरल दिमोस्थेनीस ग्रिगोरियादिस यांनी केले. भारतीय हवाई दलाच्या प्रमुखाचा हा दौरा दिसायला सामान्य असला तरी त्यामागचा राजनैतिक हेतू खूपच महत्त्वाचा आहे.

भारत आणि ग्रीस यांच्यात 'इनियोचोस २३' आणि 'इनियोचोस २५' द्विपक्षीय युद्धा सराव सुरू आहे. अशाप्रकारचा अभ्यास दोन्ही देशांतील सैन्य आधीच करत आहेत. परंतु हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांच्या दौऱ्याचे टायमिंग आणि त्यामागचा हेतू तुर्कीला चिंतेत टाकणारा आहे. तुर्की हा पाकिस्तानचा सैन्य भागीदार देश आहे. अलीकडेच भारतविरोधी आवाजांसाठी तुर्की एक प्रमुख मंच बनला आहे. ग्रीसमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय हवाई दल प्रमुखांना हेलेनिक हवाई दल (HAF) संघटनेने मिशन आणि ऑपरेशनल माहिती देण्यात आली. याशिवाय ऑपरेशन्स आणि प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर चर्चा करण्यात आली आहे. ग्रीसच्या त्यांच्या भेटीदरम्यान भारतीय हवाई दल प्रमुख, HAFGS च्या प्रमुखांसह, हेलेनिक हवाई दलाच्या फायटर विंग तसेच टाटोई येथील डेकेलिया हवाई तळावरील हेलेनिक हवाई दल अकादमीला भेट देणार आहेत.

भारतीय हवाई दलाकडून काय मदत हवी?

या महिन्याच्या सुरुवातीला ग्रीस मिडिया रिपोर्टनुसार, ग्रीस हवाई दलाला त्यांचे प्रशिक्षण आणखी उत्तम बनवण्यासाठी भारताच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती आणि रणनीती जाणून घ्यायची आहे. भारतीय हवाई दलाने त्यांनी पाकिस्तानात केलेले ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती शेअर करावी जेणेकरून त्यांच्या हवाई दलाला आणखी अत्याधुनिक करता येईल असं ग्रीसला वाटते. तुर्की आणि ग्रीसमधील संबंध कित्येक वर्षापासून तणावपूर्ण आहेत. मग ते सायप्रस वाद असेल, एजियन सागरमध्ये नौदलाशी टक्कर असेल या दोन्ही देशातील हवाई दलातही संघर्ष सुरू असतो. 

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर ज्या पद्धतीने अचूक हल्ले केले ते ग्रीस एक केस स्टडी म्हणून पाहत आहे. ग्रीक हवाई दलाने या ऑपरेशनबद्दल भारताकडून धोरणात्मक माहिती आणि सामरिक डेटा मागितला आहे, विशेषतः भारताने राफेल आणि सुखोई सारख्या प्रगत प्लॅटफॉर्मचा वापर किती अचूकतेने केला याचे ग्रीस सिटी टाईम्सच्या वृत्तात कौतुक करण्यात आले. भारताने आपली रणनीती बदलली आहे आणि तुर्कीला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचे धोरण त्याच्या नियोजनाचा एक भाग बनवून पुढची तयारी करत आहे असंही सांगण्यात येत आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर