पियानो वाजवणाऱ्या कोंबडीने मिळवली वाहवा
By Admin | Updated: June 10, 2017 00:28 IST2017-06-10T00:28:22+5:302017-06-10T00:28:22+5:30
ही घटना आहे अमेरिकेतील. रिआलिटी टॅलेंट शोमध्ये एका कोंबडीने उपस्थितांना चक्रावून टाकले ते पियानो वाजवून. तसेही टॅलेंट शोमध्ये

पियानो वाजवणाऱ्या कोंबडीने मिळवली वाहवा
ही घटना आहे अमेरिकेतील. रिआलिटी टॅलेंट शोमध्ये एका कोंबडीने उपस्थितांना चक्रावून टाकले ते पियानो वाजवून. तसेही टॅलेंट शोमध्ये (कुकिंग किंवा डान्सिंग) उपस्थितांना आश्चर्याचे अनेक धक्के बसत असतात. या शोमध्ये असे काही घडत असते की ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. तसाच हा शो होता. त्यात टॅलेंट शोमध्ये दोन महिला एका कोंबडीला घेऊन आल्या होत्या. ही कोंबडी पियानो वाजवील असे त्या महिलांनी सांगितल्यावर सगळ््यांनाच हसू आवरले नाही.
शोच्या जजेसनाही प्रश्न पडला की असे कसे होऊ शकते? कोंबडी पियानो कसे वाजवणार? नंतर असे काही घडले की जजेसना सन्मान म्हणून उठून उभे राहावे लागले. कोंबडीने आपल्या चोचीने पियानो वाजवायला सुरवात केली. ते पाहून उपस्थितांना अचंबित व्हावे लागले. त्यांचा त्यांच्याच डोळ््यांवर व कानांवर विश्वास बसेना. या कोंबडीचे नाव जोकगू होते. अगदी सुरवातीला कोंबडी पियानोजवळ गेल्यावर तिला संगीत वाजवण्यात काही गोडी असल्याचे दिसले नाही. नंतर तिने अचानक पियानोचे बटन दाबून संगीत सुरू केले. कोंबडी पियानो वाजवते हे पाहून उपस्थितांनी उभे राहून टाळ््यांचा कडकडाट केला. कोंबडी पियानो वाजवते आहे हे पाहून जजेसदेखील तिच्या सन्मानार्थ उठून उभे राहिले.