तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 07:16 IST2025-04-29T07:15:37+5:302025-04-29T07:16:22+5:30

या ब्लॅकआउटमुळे लाखो लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. युरोन्यूज पोर्तुगालच्या मते, पोर्तुगाल आणि स्पेनच्या राजधान्यांमधील अनेक मेट्रो ट्रेन स्थानकांमधील बोगद्यांमध्ये अडकल्या आहेत. लोक या मेट्रोमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

Power outage in three countries at the same time; everything stopped traffic signals across the country affected | तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम

तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम

बार्सिलोना : सोमवारी भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजता युरोपीय देश स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्समध्ये वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे तिन्ही देशांची मेट्रो, विमानतळे, रेल्वे आणि मोबाइल नेटवर्क ठप्प झाले आहे.

मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

या ब्लॅकआउटमुळे लाखो लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. युरोन्यूज पोर्तुगालच्या मते, पोर्तुगाल आणि स्पेनच्या राजधान्यांमधील अनेक मेट्रो ट्रेन स्थानकांमधील बोगद्यांमध्ये अडकल्या आहेत. लोक या मेट्रोमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी सांगितले की रेल्वे सेवा बंद होत्या, पोर्तो आणि लिस्बन दोन्ही ठिकाणी मेट्रो सेवा बंद होत्या आणि देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम झाला होता. वीजपुरवठा १० तास खंडित राहू शकतो असा अंदाज वीज वितरक कंपन्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येथील व्यवस्थेचा बाेजवारा उडाला आहे.

ब्लॅकआउट का झाले? सायबर हल्ला झाला?

युरोपच्या इलेक्ट्रिक ग्रिडमधील बिघाड हे या ब्लॅकआउटचे कारण असू शकते. त्यामागचे कारण शोधणे सुरू आहे.

नैर्ऋत्य फ्रान्समधील अलारिक पर्वतावर आग लागली आहे. यामुळे पेरपिगन आणि पूर्व नारबोनदरम्यानच्या उच्च-व्होल्टेज वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित होण्याचे हे एक संभाव्य कारण मानले जात आहे.

मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्यामागे सायबर हल्ला होता का याचा तपास सुरू आहे. पण अद्याप कोणतेही ठोस पुरावे हाती आलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय विमानतळावरही वीज संकटाचा परिणाम झाला. कामकाज थांबविले गेले..

Web Title: Power outage in three countries at the same time; everything stopped traffic signals across the country affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.