'इन्स्टाग्राम'च्या 'CEO'बाबतचा अश्लील विनोद 'पॉर्न स्टार'ला भोवला; अकाऊंट केलं बॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:03 IST2020-12-12T21:03:09+5:302020-12-12T21:03:46+5:30
पॉर्न स्टार केंद्रा सुंदरलँड हिनं काही आठवड्यांपूर्वी तिचा एक अर्धनग्न फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता.

'इन्स्टाग्राम'च्या 'CEO'बाबतचा अश्लील विनोद 'पॉर्न स्टार'ला भोवला; अकाऊंट केलं बॅन
नवी दिल्ली
'इन्स्टाग्राम'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अॅडम मोसेरी यांच्याबाबत अश्लिल विनोद केल्याचं प्रकरण पॉर्न स्टार केंद्रा सुंदरलँड हिला चांगलंच भोवलं आहे. 'इन्स्टाग्राम'ने तिच्या अकाऊंटवर बंदी घातली आहे.
पॉर्न स्टार केंद्रा सुंदरलँड हिनं काही आठवड्यांपूर्वी तिचा एक अर्धनग्न फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. इन्स्टाग्रामच्या नियमांचे उल्लंघन होत असतानाही तिच्या फोटोवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर तिनं थेट इन्स्टाग्रामच्या सीईओंसोबत संबंध असल्याचं विधान केलं आणि सर्वांना धक्काच बसला.
"मी याआधी अॅडम मोसेरी यांच्यासोबत सेक्स अॅट्स केलेले असल्यानं त्यांनी माझ्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही", असं केंद्रा हिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर म्हटलं होतं. यानंतर एकच गहजब झाला. अखेर इन्स्टाग्रामने या प्रकरणाची दखल घेऊन केंद्रा सुंदरलँड हिचं अकाऊंट बंद केलं आहे.
२५ वर्षीय केंद्रा हिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे टॉपलेस फोटो अपलोड केले होते. त्या फोटोंमधून इन्स्टाग्रामच्या नियमांचा भंग होत असतानाही काही आठवडे ते फोटो तिच्या अकाऊंटवर तसेच दिसत होते. त्यावर कोणतीही कारवाई इन्स्टाग्रामकडून करण्यात आली नव्हती.