सेक्स, लव्ह, जिहादवर पोप फ्रान्सिसची गाईडलाईन

By Admin | Updated: April 8, 2016 21:31 IST2016-04-08T21:20:26+5:302016-04-08T21:31:36+5:30

पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळातील बहुप्रतीक्षित दस्तावेज शुक्रवारी खुला करण्यात आला आहे. लग्न आणि परिवार यासंबंधीच्या नियमांत पोप आणि कॅथलिक फादरमध्ये मतभेद आढळून आले आहेत.

Pope Francis' guideline on sex, love, jihad | सेक्स, लव्ह, जिहादवर पोप फ्रान्सिसची गाईडलाईन

सेक्स, लव्ह, जिहादवर पोप फ्रान्सिसची गाईडलाईन

ऑनलाइन लोकमत

वेटिकन सिटी, दि. ८ - पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळातील बहुप्रतीक्षित दस्तावेज शुक्रवारी खुला करण्यात आला. लग्न आणि कुटुंब यासंबंधीच्या नियमांमध्ये पोप आणि कॅथलिक फादरमध्ये मतभेद दिसून आले आहेत.
घटस्फोट आणि पुनर्विवाह या मुद्दावर पोप आणि कॅथलिक परिषदेचं एकमत झालं नसून सध्याच्या चर्चच्या नियमानुसार पहिलं लग्न झालेली व्यक्ती नव्या पार्टनरसोबत संबंध प्रस्थापित करू शकत नाही.  आणि जर असे केल्यास तो व्यभिचार समजण्यात येतो.
पहिलं लग्न संपुष्टात आल्यावरच दुसरं लग्न करण्याची कॅथलिक धर्मात परवानगी आहे. दुसरं लग्न करण्यासाठी पहिलं लग्न झालं नसल्याची माहिती देण्याचंही कॅथलिक चर्चेला देण्याचं बंधकारक असतं. मात्र या सगळ्या नियमांवर ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. या विषयासंबंधी पोप फ्रान्सिस यांनी कॅथलिक ग्रुपला प्रगल्भता दाखवण्याचे सांगितले आहे. 

Web Title: Pope Francis' guideline on sex, love, jihad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.