डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 08:55 IST2025-09-10T08:54:42+5:302025-09-10T08:55:33+5:30

India- America News: रशियातील तेल आणि टॅरिफवरून भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली.

PM Narendra Modi responds to Donald Trump; both express confidence on India-US trade talks | डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा

रशियातील तेल आणि टॅरिफवरून भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भारताबद्दल भलीमोठी पोस्ट लिहिली आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूप चांगले मित्र म्हटले.  मोदींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, "भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहेत. मला खात्री आहे की, आमच्या व्यापार चर्चेमुळे भारत-अमेरिका भागीदारीच्या अमर्याद शक्यतांचा मार्ग मोकळा होईल. आमची टीम शक्य तितक्या लवकर या दिशेने चर्चा करण्यासाठी काम करत आहेत. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्यासही उत्सुक आहे. दोन्ही देशांच्या लोकांसाठी उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू."

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू असल्याबद्दल मला आनंद आहे. माझे चांगले मित्र नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्यास मी उत्सुक आहे. मला खात्री आहे की, या चर्चेतून दोन्ही महान देशांसाठी चांगला आणि यशस्वी तोडगा निघेल."

शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिका-भारत यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. त्यांनी दोन्ही देशांचे संबंध 'विशेष' असल्याचे म्हटले. ट्रम्प म्हणाले की, "मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. सध्या ते जे करत आहेत, ते मला आवडत नाही, पण भारत आणि अमेरिकेतील संबंध खूप खास आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही. कधीकधी आपल्यात काही मतभेद असतात."

Web Title: PM Narendra Modi responds to Donald Trump; both express confidence on India-US trade talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.