शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

किंग ऑफ फेसबुक पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगात बनले 'नंबर वन' नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:25 IST

नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे.

नवी दिल्ली - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करत नरेंद्र मोदी यांनी देशात सत्ता मिळवली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनविण्यात सोशल मिडीयाचा मोठा वाटा आहे. अनेक वर्षानंतर नरेंद्र मोदींवर विश्वास टाकत लोकांनी प्रचंड बहुमतात मोदी सरकार निवडून दिलं.  सोशल मिडीयावर नरेंद्र मोदी यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहेच. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. 2019 वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला 4.35 कोटी लाईक्स आहेत तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास 1.37 कोटी लाईक्स आहेत.

वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या नंबरवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक पेजला 2.30 कोटी लाईक्स आहेत. हा अहवाल दरवर्षी तयार केला जातो. तर या अहवालानुसार ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो फेसबुकवर सर्वाधिक वेळ घालवत असल्याचं सांगण्यात आलंय. 

या अहवालानुसार तिसऱ्या नंबरवर क्वीन रानिया यांचा नंबर लागतो. जॉर्डनचे सुलतान अब्दुल्लाह यांच्या पत्नी असलेल्या रानिया यांना 1.69 कोटी लाईक्स आहेत. रानिया यांचे फेसबुकसोबत ट्विटर, इंन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरदेखील अकाऊंट आहेत. एक मार्चपर्यंत फेसबुकने केलेल्या अहवालानुसार फेसबुकच्या या सर्व पेजेसला मिळून 34.50 कोटी लाईक्स आहेत. तर पेजवर टाकण्यात येणाऱ्या पोस्टवर 76.7 कोटी लाईक्स, कमेंट्स, शेअर्स आहेत.  

कसा तयार केला जातो अहवाल?फेसबुकच्या काउंडटैंगल टूलच्या मदतीने 962 फेसबुक पेजचे एक्टिविटीचं विश्लेषण करण्यात येते. ज्या पेजचा सर्व्हे केला जातो त्यामध्ये देशातील प्रमुख व्यक्ती किंवा त्यांचे सरकार यांचा समावेश असतो. 

फेसबुकवर लाईक्स कशा वाढविल्या जातात?  फेसबुकवर लाईक्स वाढविण्यासाठी जाहीरात टूल्सच्या माध्यमातून पेज प्रमोट केले जाऊ शकते. अनेक राजकीय नेते, राजकीय पक्ष फेसबुक पेजला प्रमोट करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशल मिडीयाच्या माध्यमातून राहण्यासाठी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात. 

टॅग्स :FacebookफेसबुकNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पSocial Mediaसोशल मीडिया