pm narendra modi bahrain bilateral regional issues updates | आपलं नातं फक्त सरकारांचं नव्हे, तर संस्कारांचं आहे- नरेंद्र मोदी 
आपलं नातं फक्त सरकारांचं नव्हे, तर संस्कारांचं आहे- नरेंद्र मोदी 

मनामाः पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असून, त्यांनी आज बहरिनमधल्या भारतीयांना संबोधित केलं आहे. ते म्हणाले, भारताच्या पंतप्रधानाच्या स्वरूपात बहरीनमध्ये येण्याची संधी मिळाली, असं तुमचं प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. भारतातली विविधता हीच त्याची शक्ती आहे. मी श्रीनाथजींच्या मंदिरात जाऊन तुमच्या देशाच्या समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करणार आहे. हे पूर्ण क्षेत्रातील जुनं मंदिर आहे. गल्फ देशांतही कृष्ण कथा ऐकण्याची परंपरा आजही अबाधित आहे. भारतीयांचं भगवान कृष्णाप्रति विशेष प्रेम आहे. बहरीनच्या प्रगतीत भारतीयांचं मोठं योगदान आहे. आपलं नातं फक्त सरकारांचं नाही, तर संस्कारांचं आहे.

मला पाच हजार वर्षं जुन्या संबंधांना पुन्हा चालना द्यायची आहे. बहरीनमधल्या भारतीयांना भेटण्यासाठीच मी आलो आहे. बहरीनमधल्या भारतीय समुदायाला न्यू इंडियासाठी आमंत्रित करत आहे. बहरीनबरोबर भारताचे कायमच व्यापारी संबंध राहिले आहेत. आज जन्माष्टमीचा पवित्र दिवस आहे. जगभरात पसरलेल्या भारतीयांना जन्माष्टमीच्या माझ्याकडून अनंत शुभेच्छा. पुढे ते म्हणाले, तुम्ही तुमच्या भारतातल्या कुटुंबीयांना विचारल्यास तेसुद्धा तुम्हाला भारतातल्या वातावरणात आता बदल झाल्याचं सांगतील. तुम्हाला भारताला बदललेलं पाहायचं आहे की नाही?, भारत आता प्रगतीची एक एक शिखरं पादाक्रांत करत चालला आहे. भारताचं चांद्रयान 2 सुद्धा 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे. या प्रगतीमुळे जगभरात भारताच्या अवकाश मोहिमेचीच चर्चा आहे. भारतानं एवढ्या कमी खर्चात चंद्रावर यान कसं काय पाठवलं, यानं सगळं जगच आश्चर्यचकित झालं आहे.  भारतानं येत्या 5 वर्षांत अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची करण्याचं लक्ष्य ठेवल्याचंही मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं आहे. 


Web Title: pm narendra modi bahrain bilateral regional issues updates
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.