शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीमध्ये भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 20:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीतील भव्य स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.

PM Modin in UAE: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या UAE दौऱ्यावर असून, त्यांनी बुधवारी(दि.14) अबुधाबी येथील भव्य-दिव्य अशा श्री बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) मंदिराचे उद्घाटन केले. आखाती देशातील हे पहिले हिंदूमंदिर आहे. मंदिर परिसरात दाखल होताच महंत स्वामी महाराज यांच्यासह अनेक संतांनी पीएम मोदींचे स्वागत केले.

यावेळी पंतप्रधान मोदींनीही महंत स्वामी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर पीएम मोदींच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर पीएम मोदी आरतीमध्ये सहभागी झाले. तसेच, त्यांनी स्वामी महाराज यांच्यासोबत संपूर्ण मंदिराची पाहणी केली. विशेष म्हणजे, 2018 मध्ये मोदींच्याच हस्ते मंदिराची पायाभरणी झाली होती. 

700 कोटी रुपये खर्चून बांधले BAPS हिंदू मंदिर अबुधाबीचे BAPS स्वामीनारायण मंदिर 108 फूट उंच, 262 फूट लांब आणि 180 फूट रुंद आहे. ही तयार करण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंदिराच्या बांधकामात केवळ चुनखडी आणि संगमरवरी वापरण्यात आला आहे. मंदिराच्या बांधकामासाठी 700 कंटेनरमध्ये 20,000 टन पेक्षा जास्त दगड आणि संगमरवरी अबुधाबीला आणण्यात आले होते.

27 एकर जागेवर बांधलेले मंदिरऑगस्ट 2015 मध्ये UAE सरकारने अबू धाबीमध्ये मंदिर बांधण्यासाठी 13.5 एकर जमीन भेट दिली. त्यानंतर 2019 मध्ये मंदिरासाठी अतिरिक्त 13.5 एकर जमीन देण्यात आली. अशाप्रकारे या मंदिराचा परिसर 27 एकरात पसरलेला आहे. हे मंदिर आखाती देशातील पहिले हिंदू मंदिर आहे. या मंदिरामुळे या परिसरातील पर्यटनालाही चालना मिळेल. भारतसह जगभरातील पर्यटक येथे येतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीInternationalआंतरराष्ट्रीयHinduहिंदूTempleमंदिर