PM Modi Bangladesh Visit : PM मोदी बांगलादेशात पोहोचले, शेख हसीनांनी केलं स्वागत; गार्ड ऑफ ऑनरनेही करण्यात आलं सन्मानित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 11:27 IST2021-03-26T11:27:16+5:302021-03-26T11:27:25+5:30
या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान मोदी 27 मार्चला बांगलादेशातील गोपालगंज येथे मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थळाला भेट देणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वाची...

PM Modi Bangladesh Visit : PM मोदी बांगलादेशात पोहोचले, शेख हसीनांनी केलं स्वागत; गार्ड ऑफ ऑनरनेही करण्यात आलं सन्मानित
ढाका - पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमध्ये पोहोचले आहेत. ते येथे अनेक कार्यक्रमांत भाग घेणार आहेत. ढाका येथील विमान तळावर पोहोचताच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. येथे मोदींना गार्ड ऑफ ऑनरनेही सन्मानित करण्यात आले. (PM Modi Bangladesh Visit PM Sheikh Hasina welcomes PM Narendra Modi at Dhaka airport)
#WATCH: PM Narendra Modi received by PM of Bangladesh Sheikh Hasina as he arrives in Dhaka on a two-day visit to the country. pic.twitter.com/oSC0f9prV8
— ANI (@ANI) March 26, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर असून कोरोना काळातील हा त्यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमासाठी मोदी मुख्य अतिथी म्हणून बांगलादेशात पोहोचले आहेत. या दोन दिवसांत ते इतरही अनेक कार्यक्रमात भाग घेतली.
Prime Minister Narendra Modi being accorded Guard of Honour upon his arrival in Bangladesh. Visuals from Hazrat Shahjalal International Airport in Dhaka. pic.twitter.com/NJBTa91Va0
— ANI (@ANI) March 26, 2021
मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थळाला भेट -
या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान मोदी 27 मार्चला बांगलादेशातील गोपालगंज येथे मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थळाला तसेच इतर काही तीर्थ स्थळांना भेट देणार आहेत. या स्थळांना भेट देणारे पंतप्रधान मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान असतील. मोदींच्या या भेटींना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्व आहे. कारण पश्चिम बंगालमधील अनेक विधानसभा क्षेत्रांत मतुआ समाजेचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत.
भारताने बांगलादेशला कोरोना लसीचे 90 लाख डोस दिले -
भारताचे बांगलादेशसोबत असणारे संबंध मजबूत आणि सौदार्हपूर्ण आहेत. नेबरहुड फर्स्ट या धोरणातंर्गत भारताने बांगलादेशला वेळोवेळी मदत केली आहे. कोरोना संकटाच्या काळातही भारताने बांगलादेशला मोठी मदत केली आहे. भारताने बांगलादेशला कोरोना लसीचे 90 लाख डोस दिले आहेत. ही मदत इतर कोणत्याही देशाला दिलेल्या मदतीपेक्षा अधिक आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी आणि बांगलादेशच्या ढाका या दोन शहरांदरम्यानच्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
गेल्या वर्षीच ठरला होता दौरा -
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत व्हर्च्युअली मीटिंग केली होती. त्यावेळीच या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. जानेवारी 2021मध्ये बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन भारत भेटीवर आले होते. त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे बांगलादेश दौऱ्यावर गेले होते.