उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 06:46 IST2025-07-14T06:45:50+5:302025-07-14T06:46:09+5:30
बी२०० सुपर किंग एअर या विमानाला एक ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप होते. या विमानात १२ जण बसू शकत होते.

उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ...
ब्रिटनमध्ये एक लहान विमान उड्डाण करताच विमानतळ परिसरात कोसळले आणि एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. लंडनच्या साऊथएंड विमानतळावर हा अपघात झाला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप मृतांबाबत काहीही माहिती आलेली नाही.
हे एक मेडिकल ट्रान्सपोर्ट विमान बीचक्राफ्ट बी200 सुपर किंग होते. रुग्णांना ने-आण करणारे हे विमान नेदरलँडसाठी निघाले होते. अपघातानंतर या विमानतळावरून उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच विमानतळाशेजारील रग्बी क्लब आणि गोल्फ क्लब देखील बंद करण्यात आले.
स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. बी२०० सुपर किंग एअर या विमानाला एक ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप होते. या विमानात १२ जण बसू शकत होते. हे विमान नेदरलँड्समधील लेलिस्टॅडला जात होते. विमानात किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.