शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Plane Crash: 'ही वाईट घटना टाळायला हवी होती", डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात अपघाताबद्दल शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:53 IST

Washington DC plane crash: अमेरिकेतली वॉशिंग्टन डीसीमध्ये एका प्रवासी विमानाची लष्करी हेलिकॉप्टरला धडक होऊन भयंकर दुर्घटना घडली. या अपघाताबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली आहे.  

News about plane crash, Washington DC: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एका प्रवासी विमानाची आणि हेलिकॉप्टरची धडक झाली. हेलिकॉप्टर आणि विमान नदीत कोसळले. यात १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या जात असून, खुद्द अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनीच प्रश्न उपस्थित केला आहे. (Plane crashes into Potomac River near Washington, DC airport)

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अमेरिकन लष्कराचे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आणि अमेरिकन ईगलच्या विमानाची धडक झाली. ६५ प्रवासी क्षमता असलेल्या या विमानात वैमानिक, कर्मचाऱ्यांसह ६४ लोक होते, अशी माहिती आतपर्यंत समोर आली आहे. पण, या घटनेबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांनीच एक पोस्ट करत शंका उपस्थित केल्याने, हा अपघात की घातपात? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणते प्रश्न केले उपस्थित?

अध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "विमान नेहमीच्या वेळेप्रमाणे धावपट्टीकडे जात होते. पण, अचानक या वेळेत हेलिकॉप्टर सरळ विमानाच्या दिशेने जात राहिले. आकाश स्वच्छ होते आणि विमानाचे लाईट्स सुरू होते. हेलिकॉप्टर वर किंवा खाली का नेण्यात आले नाही? जर समोर विमान दिसत होते, तर नियंत्रण कक्षाने हेलिकॉप्टरच्या पायलटला काय करायला हवे हे का सांगितले नाही? ही खूप वाईट परिस्थिती आहे आणि असं दिसतंय की ती टाळायला हवी होती. हे चांगलं झालं नाही", असे प्रश्न उपस्थित करत डोनाल्ड ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली आहे.

जी माहिती आता समोर आली आहे, त्यानुसार अमेरिकी लष्कराच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरने अमेरिकन ईगलच्या विमानाला धडक दिली. त्यानंतर हेलिकॉप्टर आणि विमान नदीत कोसळले. या प्रकरणाचा आता अमेरिकेची केंद्रीय तपास यंत्रणा एफबीआयने तपास सुरू केला आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातairplaneविमानAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प