शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या मिसाइलवर स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो! 'या' एका कारणामुळे इराणमध्ये पेड्रो सांचेज झाले 'हिरो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 08:00 IST

Iran Missile Pedro Sanchez Photo Viral: इराणच्या बॅलिस्टिक मिसाइलवर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांचा फोटो व्हायरल. अमेरिका-इस्रायल हल्ल्यांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे इराणमध्ये सांचेज यांचे कौतुक. वाचा सविस्तर बातमी.

मध्य पूर्वेतील युद्धाच्या रणधुमाळीत सध्या सोशल मीडियावर एक अजब फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा एक जवान बॅलिस्टिक मिसाइलवर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांचा फोटो असलेले स्टीकर चिकटवताना दिसत आहे. इराणने आपल्या मिसाइलवर एका पाश्चात्य देशाच्या नेत्याचा फोटो लावून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

इराणने का दिले सांचेज यांना हे 'क्रेडिट'?पेड्रो सांचेज हे अशा मोजक्या पाश्चात्य नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांची कडक शब्दांत टीका केली आहे. सांचेज यांनी या युद्धाला "बेकायदेशीर" आणि "अन्यायकारक" म्हटले होते. जेव्हा बहुतेक पाश्चात्य देश अमेरिकेच्या बाजूने उभे होते, तेव्हा सांचेज यांनी इराणच्या समर्थनार्थ आणि शांततेच्या बाजूने भूमिका घेतली. इराणच्या जनतेने आणि लष्कराने सांचेज यांच्या या भूमिकेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले असून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिसाइलवर त्यांचे फोटो लावण्याचा हा अनोखा मार्ग निवडला आहे.

ट्रम्प आणि सांचेज यांच्यात जुंपली:सांचेज यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. ट्रम्प यांनी स्पेनला "भयानक मित्र" म्हटले असून स्पेनसोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. तरीही सांचेज आपल्या 'नो टू वॉर' या भूमिकेवर ठाम आहेत.

भारतावरही होणार परिणाम?इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. इंधनाचे वाढते दर आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे भारतासारख्या विकसनशील देशांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Spain PM's photo on Iranian missile: A stance made him hero.

Web Summary : Iran lauded Spain's PM Sánchez for criticizing US-Israel actions, placing his photo on a missile. Trump criticized Sánchez's stance. The conflict impacts global economy, potentially affecting India.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध