शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

फायझरच्या लसीला 'या' बड्या देशाकडून ग्रीन सिग्नल; भारताच्या निर्णयाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 11:48 IST

CoronaVirus Vaccine: फायझरला पहिल्यांदा ब्रिटनने परवानगी दिली होती. यानंतर बहारीन दुसरा देश ठरला होता. याच कंपनीने भारताकडेही इमरजन्सी लसीकरणाची परवानगी मागितली आहे.

ब्रिटनमध्ये फायझर कंपनीच्या कोरोना लसीचे साईडइफेक्ट समोर आले असल्याच्या दुसऱ्याच दिवशी या लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला अमेरिकेच्या समितीने ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे आता अमेरिकी सरकारही या लसीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची शक्यता आहे. समितीने सांगितले की, ही लसीचे गुण कोरोनाचे धोके कमी करतात. 

फायझरला पहिल्यांदा ब्रिटनने परवानगी दिली होती. यानंतर बहारीन दुसरा देश ठरला होता. त्याआधीच फायझरने अमेरिकेकडेही परवानगी मागितली होती. याच कंपनीने भारताकडेही इमरजन्सी लसीकरणाची परवानगी मागितली आहे. आता अमेरिकेनेही हिरवा कंदील दाखविल्याने फायझरला मोठे यश मिळाले आहे. फायझरने ही लस जर्मनीच्या बायोएनटेक सोबत विकसित केली आहे. 

गुरुवारी अमेरिकेत आठ तास जनसुनावणी झाली. यानंतर  एफडीएची लस आणि जैविक उत्पादने सल्लागार समिती (व्हीआरबीपीएसी) ने फायझरच्या लसीच्या लसीकरणाचा प्रस्ताव पास केला. व्हीआरबीपीएसीचे सदस्य आणि फिलाडेल्फीयातील बालरोगतज्ज्ञ पॉल ऑफिट यांनी सांगितले की, फायझरच्या लसीचा एक स्पष्ट फायदा आहे, दुसरीकडे आमच्यासमोर सैद्धांतिक जोखीम आहे. हे लाभ कोरोनाचे संभावित धोके कमी करतात. आणखी एक सदस्य बालरोगतज्ज्ञ ओफर लेवी यांनी सांगितले की, हा एक खूप मोठा मैलाचा दगड आहे. ब्रिटन आणि बहारीन या दोन देशांनी लसीकरणाला परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी एफडीएने फायझरची लस चाचण्यांमध्ये आणि अमेरिकेच्या नियमावलीमध्ये यशस्वी ठरल्याचे म्हटले होते. 

फाय़झरचा लसीबाबतचा डेटा चोरण्याचा प्रयत्नफायझर आणि बायोएनटेकने ब्रिटनमध्ये ज्या सरकारी संस्थेला कोरोना लसीसाठी मंजुरी अर्ज पाठविण्यात आला होता, तिथे सायबर हल्ला झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. या संस्थेतून हॅकर्सनी कोरोना लसीचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या खासगी डेटापर्यंच कोणी पोहोचले असल्याचे आढळले नाहीय. सायबर हल्ल्याची समिक्षा करण्यासाठी अधिक वेळ लागणार नसल्याचे युरोपीय मेडिसिन एजन्सीने आश्वासन दिले आहे, असे कंपनीने सांगितले.

अॅलर्जी ब्रिटनमध्ये फायझरची लस देण्यात येत आहे. लस टोचल्यानंतर अनेकांना अॅलर्जी देखील झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे संशोधकांची काळजी वाढली आहे. दोन्ही पीडित आरोग्य कर्मचारी Anaphylactoid Reactions चे शिकार झाले आहेत. त्यानंतर ब्रिटनच्या रेग्युलेटरी एजन्सीने एक इशारा जारी केला आहे. अशा कुठल्याही व्यक्तीला ज्यांना कुठलेही औषध, अन्न आणि लसीची अॅलर्जी आहे, अशांना फायझरची लस देण्यात येऊ नये, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे. भारतातही आपत्कालीन लसीकरणासाठी फायझरने पहिलाच अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर सिरमने आणि त्यानंतर भारत बायोटेकने अर्ज केला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ब्रिटनकडून कोरोनाच्या आठ लाख डोसचा वापर करण्यात येणार आहे. मात्र ख्रिसमसपर्यंत देशामध्ये कोरोनाच्या लसीचे लाखो डोस उपलब्ध होतील, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याAmericaअमेरिका