समुद्रावरच घर बांधून राहाणारे लोक
By Admin | Updated: April 4, 2017 05:25 IST2017-04-04T05:25:03+5:302017-04-04T05:25:03+5:30
हे आहे चीनमधील शहर. याचे वैशिष्ट्य म्हणजे या शहरातील एका भागातील लोक चक्क समुद्रावरच राहातात.

समुद्रावरच घर बांधून राहाणारे लोक
बीजिंग : हे आहे चीनमधील शहर. याचे वैशिष्ट्य म्हणजे या शहरातील एका भागातील लोक चक्क समुद्रावरच राहातात. दक्षिण पूर्व चीनच्या निंगडे सिटीजवळचे दृश्य पाहून कुणीही अचंबित झाल्याशिवाय राहत नाही. या वस्तीतील ८५०० लोक समुद्रातच घर करून राहत आहेत.
आपल्या बोटीवरच अनेकांनी संसार मांडला आहे. ते ना किनाऱ्यावर येतात ना किनारा पार करण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी राहाणारे सर्व लोक मच्छीमार असून ते टांका जमातीचे आहेत. असे सांगितले जाते की, तत्कालीन शासनाच्या त्रासाला कंटाळून हे लोक समुद्रकिनारी आले आणि नंतर येथेच स्थिरावले. असेही सांगण्यात येते की, इस. ७०० मध्ये येथे तांग राजवंशाचे शासन होते. युद्धापासून वाचण्यासाठी हे लोक या भागात आले आणि येथेच रमले.