इस्लामाबाद - क्रिकेटपासून काश्मीरप्रश्नापर्यंत सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये करणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे. सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीला सतत झोडपून काढणारा भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने आफ्रिदीचा तीळपापड झाला आहे. दिल्लीतील मतदारांनी अक्कल नसलेल्या माणसाला निवडून दिले आहे, अशी आगपाखड आफ्रिदीने केली आहे. काही वर्षांपूर्वी क्रिकेटचे मैदान गाजवणारा भारताचा डावखुरा सलामीवीर गौतम गंभीर याने राजकारणाच्या मैदानातही यशस्वीरीत्या पदार्पण केले आहे. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून गंभीरने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. दरम्यान, गांभीरच्या विजयामुळे एकेकाळी त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या शाहीद आफ्रिदीचा तीळपापड झाला आहे.
दिल्लीवासीयांनी अक्कल नसलेल्या माणसाला मतदान केले, शाहीद आफ्रिदी बरळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 16:08 IST