शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

सुदानमधल्या कुपोषित सिंहांचे फोटो व्हायरल, बचावासाठी मोहीम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:48 AM

सुदानमधल्या कुपोषित सिंहांचे फोटो व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

खारतूमः सुदानमधल्या कुपोषित सिंहांचे फोटो व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या सिंहांना वाचवण्यासाठी आता ऑनलाइन पद्धतीनं मोहीम चालवण्यात येत आहे. सुदानची राजधानी खारतूमच्या सिंहांचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. त्या फोटोमध्ये सिंह फारच कुपोषित दिसत आहेत. या सिंहांना चांगल्या ठिकाणी पाठवण्यासाठी लोकांनी आता मोहीम चालवली आहे. जेणेकरून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. सुदानची राजधानी असलेल्या एका पार्कमध्ये असलेल्या या सिंहांची हालत गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खारतूमच्या अल कुरैशी पार्कमध्ये पाच सिंह पिंजऱ्यात कैद आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. जेवण आणि औषधांअभावी त्यांच्या बरगड्यासुद्धा दिसू लागली आहेत. फेसबुकवर उस्मान सलीह यांनी आपला पार्कमधील अनुभवही कथन केला आहे. जेव्हा पार्कमध्ये ही या सिंहांना  पाहिलं तेव्हा पायाखालची जमीनच सरकली. मी त्यांच्यासाठी एक ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. पार्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या काही आठवड्यांपासून सिंहांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांची शरीरातील जवळपास दोन तृतीयांश मांस कमी झालं आहे.

अल कुरैशी पार्कच्या व्यवस्थापक एसमेल म्हणाले, सिंहांसाठी जेवण नेहमीच उपलब्ध नसतं. त्यामुळेच आपल्याला त्यांना जेवण द्यायचं असल्यास आपल्या पैशानं द्यावं लागतं. पार्कचं व्यवस्थापन खरतूम नगरपालिकेद्वारे केलं जातं. तिकडचे लोक आपापल्यापरीनं मदत करत असतात. गेल्या काही दिवसांपासून सुदानही आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे. याचा परिणाम माणसांबरोबरच प्राण्यांवर होत असल्याचं पाहायला मिळतं आहे.