passenger plane carrying more than 80 people crashes afghanistan taliban area | अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त

अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त

काबूलः अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतातील याक जिल्ह्यात एका प्रवासी विमानाला अपघात झाला आहे. या अपघातग्रस्त विमानातून 80हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमानानं हवेतच पेट घेतला असून, ज्या ठिकाणी अपघात झाला तो भाग तालिबानच्या नियंत्रणात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, एरियाना अफगाण एअरलाइन्सचं बोइंग 737-400 विमान डोंगराळ भागात दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्ससंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

 

Web Title: passenger plane carrying more than 80 people crashes afghanistan taliban area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.