प्रवासी बोटीला आग; शेकडो अडकले
By Admin | Updated: December 29, 2014 04:07 IST2014-12-29T04:07:54+5:302014-12-29T04:07:54+5:30
ग्रीसहून इटलीकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीला आग लागली असून, बोटीमधील प्रवाशांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

प्रवासी बोटीला आग; शेकडो अडकले
अथेन्स : ग्रीसहून इटलीकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीला आग लागली असून, बोटीमधील प्रवाशांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. नॉर्मन अटलांटिक या इटलीच्या प्रवासी बोटीत ५०० प्रवासी आणि खलाशांचा ताफा आहे. १५० लोकांना वाचविण्यात आल्याचे ग्रीक तटरक्षक दलाच्या सूत्रांनी सांगितले.
भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता ही आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. वेळेवर मदत बचाव पथके पोहोचली नाहीत, तर थंडीमुळे या बोटीतील प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार या बोटीत २०० हून अधिक वाहनेही आहेत.